साद

Started by wadikar durga, July 05, 2019, 10:15:41 AM

Previous topic - Next topic

wadikar durga

चंद्र कानी सांगून गेला
रात्र ही कुजबुजुन गेली
प्रीतीची रातरानी गंध पसरुन गेली
चाँदनी ही हळूच हसून म्हणाली
प्रेमाने साद दिली तुला
आज तुझ्या उम्बरयात
दे हाक तुझ्या जीवलगा

कस सांगू त्यांना
काय झाले जीवाचे हाल
साद ऐकून जीव झाला
पूरा बेहाल
डोळ्याची पापणि ही
लाजेने लवते
स्वासचि स्पंदने काळजाचा
ठोका चुकवते

कोण आहे तो माहीत नाही ?
पण आहे त्याचा स्पर्श मखमली
या देहावर
स्वप्नात येतो नेहमी
पण समोर येत नाही
मी ईथ त्याच्या आठवनीत
स्वप्नाची बाग फुलवते
तो कुठेतरी बसला असेल
वाट माझीहि बघते

साद मी ही देते
साद तो ही देतो
मिलनाच्या क्षणाला
दोघेही तळमळ्तो ।
|||||| दुर्गा