पर्यावरण…

Started by prashantdevmore, July 11, 2019, 11:26:15 AM

Previous topic - Next topic

prashantdevmore

पर्यावरण...
हे तर सर्वांनीच ऐकले असेल. आपला खरा मित्र, निसर्ग जो आपल्यास जगण्यासाठी भरपूर मदत करतो.

मी तर म्हणतो पर्यावरण म्हणजे 'परीचे आवरण'. हो असेच वाटते मला. हा हिरवागार परिसर, वेगवेगळ्या रंगांनी भरलेला आहे.
पाने, फुले, पक्षी, झाडे, प्राणी, नदी, तलाव, धबधबा आणि भरपूर काही. हे काही एका, परिपेक्षा कमी नाही.
हे हिरवी झाडे, रंगबिरंगी फुले आणि छाती पुढे टाकून, तटस्थ उभा असणारा तो डोंगर,  वेगवेगळे ऋतू, रिमझिम पाऊस, धुंद होऊन पिसारा फुलवून नाचणारा मोर; ही वाऱ्याची मंद झुळूक,त्यावर डोलणारी झाडे...!

हे सगळे दृश्य एकदम मन प्रफुल्लित करते, नाही का? म्हणून मी म्हणतो आपल्या सभोवताली परीचे आवरण आहे म्हणून "पर्यावरण".

किती छान असतो हा पावसाळा. थेंब थेंब पडतो, पण सगळ्यांना, जुन्या आठवनी कडे घेऊन जातो.
आजही भरपूर लोक पाऊस पडला की मस्त गरम गरम भाजी खातात.
पाऊस पडताना भजी खाण्याची मजा काही अगळीकच.

पृथ्वी बनवणार्याने किती छान असा निसर्ग बनवला आहे. सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करून आवश्यक असे सर्व काही निर्माण केले आहे.
आपल्या जगण्यासाठी सर्व मदत हा निसर्ग करतो. जसे की हवा, पाणी, अन्न हे सर्व काही आपण या निसर्गाकडून घेतो.
पण परतफेड म्हणून आपण काय देतो. किंबहुना, हे जणून घ्या, की आपण या पर्यावरणाला परत देण्याइतपत मोठे नाही!

Read more
https://devmoreprashant.blogspot.com/2018/07/