या खलनायकांच करायचं काय?

Started by Parshuram Sondge, July 15, 2019, 05:18:18 AM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

आज सकाळची गोष्ट.रस्त्यानं जात असताना एका काॅर्नरवर एक स्कूल बस थांबली होती.तो त्यांचा थांबा असावा.तिथं अनेक मुलं थांबली होती.त्या सोबत काहीच्या आया ही होत्या. पाॅश ड्रेस,शूज,टाय.स्कूलबॅग्जस्  पाठीवर ....आता सरकारानं किती ही दप्फतराच्या ओझ्याचं टेन्शन घेऊ दया .पालक आणि त्यंचे टिचर..हे मात्र गंभीर होत नाहीत .ते होणार पण नाहीत .दप्फतर हा  विषय फक्त मुलांशी संबधीत राहिलेला नाही .तो पालकांच्या आणि शाळांच्या प्रिस्टेजचा प्रश्न  झालेला  आहे. असो.त्य सोबत पुन्हा टिपिन बॅग्स ....त्या बाॅटल....

. . त्यात मुलांच्या घोळक्यात एक फारच लहान मुलगा होता.अडीच -तीन वर्षाचं मुलगा असेल तो..त्यला शाळेत जायचं नव्हतं.त्यानं अंदोलन पुकारल होतं.तो रडत होता. आरडत होता.तिथं कुणीचं त्याच दखल घेणार नव्हतं.ती घेतली ही जाणार नव्हती. आमच्या काळात आजी नावाच एक जबरदस्त सरकार असे.तिथं आपले कसले ही लाड पुरवले जायचं. नातवाला मारणं सोडा .साध धमकावनं ही शक्य नसायचं. आजी आजोबा आता घरातून हद्यपार झाले.त्यानं जी  बापाच्या पॅन्टीला मिठ्ठी मारली ते सोडत नव्हत. त्याच्या मम्मीला त्याचा फोटो काढयाचा असेल .हातात मोबाईल घेऊन ती धडपडतचं होती. एखादा  अप्रतिम व असा दूर्मीळ क्षण चिडणं सोपं काम नसते.असावा लागतो एकादा फोटो असा लेकराचा .फेसबूकला पोस्ट करता येते नाहीतर डीपी वगैरे करता येते किंवा व्हाॅटस अपला स्टेटस् ठेवता येते पण ते लहानग्य काही रडायचं थांबत नव्हतं.उलट त्यंनी अंदोलनाचा जोर व गती वाढवली .त्याची कुणी दखल घेत नव्हतं. ते अंदोलन चिरडून टाकण्यासाठी डायव्हर आला .त्याला कवळीत उचललं आणि जोरात नेऊन बसमधी मधल्या सीटवर  टाकल नि एक हाग्या दम टाकला. "आवाज करायचा ना... आवाज आला तर एका एकाला गाडीच्या खाली फेकून देत असतो."सा-या बस मध्ये गंभीर शांतता पसरली.सन्नाटा छा गया .त्या क्षुद्र जीवानं केवीलवाणा प्रयत्न केला .ती सर्व लूडबूड व्यर्थ ठरली.

"सायेब,कशाचा लाड करायचा .किती ही  लाड करायचा पण साळाचा अजिबात लाड करायचा नाही ."

"लहान अजून ...!" बाप

"लहान आहे पण शिकायला पण पायजे.घडी हुकली म्हणजे पिढी हुकली ."

"तसं लय्यी हुश्शार .ए बी सी डी लिहतोय.वन टू येत .घरी फार मेहनत घेते." इति मम्मी.

"आता तुम्ही एवढया मोठया पोस्टवर म्हणल्यावर तुमचं नाव राहिल पायजे.उग लेकरानं साळातच यायच नाय म्हणजे ...फर्स्ट स्टॅंड्रर  पर्यंत त्याच बेसिक पक्क व्हायला पायजे."

"मी नाय लाड करत .यांचाच फार लाड असतो."  सजग माता पालक.मम्मी.

 हे सार संभाषण चालु असतानी ते लहानगं काही गप्प नव्हतं.त्याला शाळेत जायचंच नव्हतं.त्यानं तिथचं काचावर बुक्या मारायला सुरू केल.आत मध्ये त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न झाला .त्यानं अधिकच वेग वाढवला.शांततेत चाललेल्या अंदोलनाला हिंसक वळण लागायला काय लागतं? ते लहानगं अधिक आक्रमक झालं.आता मात्र सा-यांचाच संयम सुटला .बापातला भंयकर डॅडी जागा झाला.ते पुढ सरसावले.लच्चा लच्चा त्याचं गाल लुचले.एक दिली ठेवून .आता तो मार नव्हता.ती ट्रिटमेन्ट होती.मारा भेणं भूत पळतं.ते लहानगं गप झाल.त्यानं "मम्मी ..मम्मी "म्हणून आर्त किंकाळया ठोकल्या.मम्मीच्या खुशीत दडायची तीव्र अपेक्षा केली. गाडी चालू झाली.ती क्रूर मम्मी तिथचं उभी होती .त्याला बाय बाय करत होती. त्या चिमुकल्याचं  एक स्कूलबसमध्ये असतानाच क्षण त्या कॅमे-यात टिपू शकली.त्याच्या मम्मीच्या  चेह-यावर एक अनोख समाधन पसरलं होतं.त्या लहानग्याच्या भविष्याची असंख्य स्वप्न तिच्या डोळयात दाटली होती.स्वप्नांची नशा सर्वात भंयकर नशा असते.त्यामुळेच आईचं वात्सल्य आटून तिची मम्मी होते आणि बापाचा डॅडी ... सारेच खलनायक
                                                       परशुराम सोंडगे
                                                      9527460358
Pprshu1312