आंबा

Started by Sachin Mhetre, July 15, 2019, 07:52:04 PM

Previous topic - Next topic

Sachin Mhetre

आंबा

आंब्याचे झुकले झाडं
बहरले ते सारे पाडं
आढीची पांघरुनी शालं
दिसामागून दिस जातीलं ।।१।।

रंग येईल केशरी कमालं
हळू उचल रस येईल
थेंबा थेंबात मधूर गोडवा
रस हा किती चाखावा ।।२।।

बघं रस जरा चाखून
बघं ओठ जरा माखून
रसना  लागेल डोलाया
तन  मनासंगे बोलाया ।।३।।

सचिन म्हेत्रे, पुणे
(मो. ९४२०२१२८३८)