ये रे ये रे पावसा.

Started by Dnyaneshwar Musale, July 23, 2019, 11:50:07 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

संपत आला जुन
कस पडतंय  अजुन ऊन,
किती पाहली वाट
नुसतं आभाळ भरून येतं दाट.

पण एकदा पावसा तु
दर्शन तरी  दे,
अन अंगणात पाणी
जरा शिपुन तरी घे.

आला तु तर
मी ही पाण्यात खेळेल होडी,
भिजुन हसेल तुझ्यासाठी रोज थोडी थोडी.

बाबा माझे तुला
पाहुन एकदा तरी हसतील,
नाही आला तु तर
ते ही गप बसतील.

आई घाबरवते मला रोज,
आभाळ गरजुन आज  तरी
पाऊस  म्हणे येणार,
मग उचलुन बाबा मला
कडेवर  शेतात घेऊन जाणार.

मला ही हौस आहे
बघायची हिरवीगार  शेती,
धन धान्य देई अशी
असे आई माझी काळी माती.

अरे पावसा
रोज अशी कशी तु देतो मला हुल
पण
पावसा आता खर सांगु
तु रोज देतो हुल,
मग तुच सांग
उद्या
तु नाही आला
तर
कशी पेटणार  माझ्या आईची  चुल.