पहावं वाटतंय गं तुला

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 04, 2019, 04:56:23 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

काळजाला चटका देणारी कविता

*कवितेचं शीर्षक.पहावं वाटतंय गं तुला*

अगं ऐक ना
तू जेव्हा हसतेस
खूप छान दिसतेस
पहावं वाटतंय गं तुला
कधी येशील तू
वाट पाहतोय तुझी
त्या वाटेवर जिथं तू अन मी एक व्हायचो
सारं काही विसरून जायचो
येशील म्हणून आज ही वाट पाहतोय
शरीर राहील नाही पण
आत्मा अजून आहे तिथेच

कारण वेदना आणि प्रेम
यांनी सोडलंच नाही मला

माझं जाऊदे तू सुखी आहेस न बस्स
आपलं काय तेव्हा उनाड होतो
आता ही उनाडचं आहे फक्त तू नाहीस
आता फक्त वारा असतो सोबतीला
तो ही तुझी आठवण करून देतो
म्हणून मी पण बोलत नाही त्याच्याशी
माहीत असून ही खेळ करतो माझ्याशी

कारण वेदना आणि प्रेम
यांनी सोडलंच नाही मला

बघ आता खूप दिवस झाले
करमत ही नाही एकटं एकटं राहून
तू येण्याची वाट वेडी पाहून
तुझं सोडून जान
चटका देऊन गेलं मनाला
म्हणून आतून जळत होतो
सांगितलं नव्हतं मी कधीच कोणाला

कारण वेदना आणि प्रेम
यांनी सोडलंच नाही मला

असुदे बाकी राहूदे बाजूला
मी काय असाच आहे वेडा
तुला आठवलं तर ये
नाही तर राहूदे उगाच त्रास नको तुला
मन खूप हट्टी आहे ना ऐकतच नाही
काढेल त्याची ही समजूत
फक्त एक कर तो वारा येतो ना
त्याला पाठवून दे
तेव्हडच सोबत होईल त्याची
आणि हो निरोप पाठव
की प्रेम नाही म्हणून
जिवंत तर नाहीच पण तेव्हडचं
अश्रूंना मोकळीक मिळेल
अजून त्रास सहन करेल तुझ्यासाठी

कारण वेदना आणि प्रेम
यांनी सोडलंच नाही मला


कविता आवडल्यास नक्की शेअर करा


✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील)
मो.९६३७०४०९००.अहमदनगर