विरोधात तू होतीस

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 08, 2019, 12:28:22 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.विरोधात तू होतीस*

विरोध कधीच नव्हता गं तुला
पण विरोधात तू होतीस
आलीस कशी गेलीस कशी
कळलं नाही माझी झालीस कशी
विसरून सारंच जगावं वाटलं
पण तू साद दिलीस पुन्हा
अन पुन्हा वेडावलो मी
चालता चालता मध्येच अडखळलो मी

तुझ्या वेदनेला
माझं समजयचो मी
आठवणीत तुझ्या गं
नकळत रडायचो मी

मागे पाहण्याची हिंमत नसतांना
तूझी साद मनाची तार छेडून जायची
स्वप्नांच्या दुनियेतील घरे
नकळत पुन्हा मोडून जायची
काय कमी वाटलं तुला माझ्यातं
मनाच्या श्रीमंतीचा मी
असं रस्त्यावर भिकारी करून गेलीस

तुला नकळत
माझं मानायचो मी
उगाच माझ्याशीच
का भांडायचो मी

तू मला समजून घेतलं नाही
अन मी ही सारं काही समजून गेलो
तुझ्या प्रेमाचा विषारी घोट
डोळे झाकून पिऊन गेलो
अस वाटलं नव्हतं नियती खेळ करेल
माझ्या नशिबाची दोर ती अशी धरेल

तुला पाहून
जगायचो मी
दुःखांसारखा
पांगायचो मी

तुझं दुःख तुझं सुख
अंतरातल्या वेदनांचा सारीपाट
अन मी त्या वरचा एक प्यादा
खेळ मोडला सारं काही संपलं
अंतर मनातल तू कधी नाही मोजलं
इथंच कुठं तरी चुकत गेलीस तू
खऱ्या प्रेमाला मुकत गेलीस तू

नेहमी अंतकरणाने
तुझाच असायचो मी
दुःखाच्या पंगतीत
नेहमीच बसायचो मी

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर