मैत्री

Started by sneha31, August 12, 2019, 12:55:00 PM

Previous topic - Next topic

sneha31

मैत्री

गौरी अग उठ बघ किती वाजलेत ," तुला कॉलेज ला उशीर होणार किती झोपणार आणखी तू,गौरीच्या आई ने हाक मारली लगेच गौरी उठली आणि घड्याळात बघितलं तर काय 9 वाजलेले गौरी आपलं सगळं आवरून तयार झाली नास्ता करून देवा पुढे हाथ जोडलं आणि आईला सांगून कॉलेज ला निघाली. धावत पळत गौरीने रिक्षा पकडली आणि कॉलेज ला पोहचली. गौरी च हे शेवटचं वर्ष होत graduation च. ती अभ्यासात अतिशय हुशार आणि क्लास मधून नेहमी first यायची.पण घरच्या वातावरणामुळे आणि परिस्तिथी मुळे नेहमी टेन्शन मध्ये च असायची . कॉलेज मध्ये पण कुणाशीच बोलायची नाही.घरी कॉम्पुटर नसल्या कारणाने तिला प्रोजेक्ट च्या कामानी net cafe मध्ये जावं लागायच. सतत ती टेन्शन मधेच राहायची मुलांशी तर अजिबात बोलायची नाही. हे गेल्या काही दिवसापासुन साहिल नि ओळखलं होत की गौरी ला कसलं तरी टेन्शन आहे . साहिल सुध्दा त्याच्या काम निमित्ताने net cafe मध्ये जायचा. साहिल ला बऱ्याचदा मनात आलं की गौरी शी बोलायचं पण त्याची हिम्मत च होत नव्हती. एक दिवस गौरी खूप रडायला लागली, साहिल ला राहवलं नाही आणि त्यानी तिला विचारलचं काय झालं रडायला ,' गौरी ने रागात च साहिल कडे बघीतलं आणि तुला काय करायचं आहे अस बोलून निघून गेली. परत दुसऱ्या दिवशी साहिल ने बोलण्याचं प्रयत्न केला पण गौरी ने त्याच्या कडे लक्ष च दिल नाही. गौरी घरी या आली आणि विचार करू लागली की कोण हा मुलगा का आपल्याशी बोलतो आहे गौरीच्या मनात मुलांविषयी फार चीड होती. रात्री झोपतांना ही गौरी ला साहिलचाच चेहरा आठवायला लागला.साहिल तसा दिसायला स्मार्ट, गोरा आणि अतिशय देखणा समजदार मुलगा होता. साहिल सुद्धा कोणाशी फार बोलत नव्हता पण गौरी ची अवस्था बघून तो बोलला होता. गौरी साहिलच्याच विचाराच झोपी गेली. साहिल सुद्धा विचार करत होता की हिला कसलं इतकं टेन्शन असावं जाणून घ्यायला हवं तो सुद्धा तिच्याच विचारात झोपी गेला. दुसऱ्या दिवशी साहिल परत बोलण्याचं प्रयत्न करतो गौरी शी आणि विचारतो कशी आहेस गौरी. गौरी नम्रपणे बोलते ठीक आहे. साहिल बोलतो मला तर वाटत नाही तू ठीक आहे म्हणुन आणि साहिल मैत्रिच हाथ पुढे करतो गौरी जरा विचार करून च होकर देते आणि दोघे पण स्मित हास्य देऊन निघून जातात. गौरी तशी साधी सरळ गोरी पान मुलगी, नाकी डोळी फार सुरेख लांब सळक तिचे केस अतिशय समजूतदार मुलगी कोणीही तिला बघताच प्रेमात पडेल अशी होती. गौरीच्या आयुष्यातलं तो पहिला मुलगा होता ज्याच्याशी तिने friendship केली होती. गौरी आणि साहिल चा मैत्रीचा प्रवास सुरु झाला.काही दिवसात च दोघे पण खूप छान मित्र बनले,  गौरी आपल्या सगळ्या गोष्टी साहिलशी share करायला लागली आणि साहिल सुद्धा . दोघांनमध्ये कधी भांडण व्हायची नाही त्यांचा मैत्रीचा प्रवास फार सुरळीत चालू होता. साहिल गौरी ला प्रत्येक गोष्टी मध्ये मदत करत होता . गौरी आणि साहिल च बोलणं रोज व्हायचं. रात्र रात्र पर्यंत msg chat करायचे. दोघांना पण एकमेकांचं सहवास आवडायला लागला होत. गौरी कधी कधी डिप्रेशनमध्ये राहायची तरीसुद्धा साहिल च्या हसऱ्या स्वभावाने तो तिला त्यातून बाहेर काढायचा. हेच गौरी ला सुद्धा आवडायचं त्याच्या सहवासात ती सगळे दुःख विसरून जायची. एक दिवस गौरी ला घरच्या सगळ्या गोष्टी खूप अनावर होतात रोजच्या भांडणापासून ती कंटाळली होती तिने रागारागाने च साहिल ला call केल आणि खुप रडली आणि बोलली की आता सगळं संपवायचंय मला साहिल खूप झालं सहन नाही होत आता मी आत्महत्या करतेय. साहिल ला धक्काच बसला आणि तो तिला समजवू लागला," अग गौरी आयुष्य इतकं सोपी नसत, निघतात हे सुद्धा दिवस तू खूप strong मुलगी आहे असं हरून कस चालणार बर, आणि रागवतो पण तो गौरी वर. गौरी ला पण कळतं साहिल च बोलणं आणि ती त्याला sorry बोलते.गौरी आणि साहिल च हे मैत्रीचं नात असच सुरू असत खूप छान मैत्रीचं नात त्यांनी विणलेले असत. आणि जगाला ही दाखवून दिलं असत की एका मुला आणि मुलीमध्ये फक्त प्रेमाचच नातं नसत तर मैत्रीच सुद्धा छान नात असत. अनेक लोकांनी गौरीच्या आणि सहलीच्या मैत्रीला नाव ठेवलेली पण त्या दोघांनी काही लक्ष दिलं नाही त्यांनी खूप छान मैत्रीचं नात जपलं होत.

नातं तुझं माझं अतुट मैत्रीचं
प्रेमच्याही पलीकडचं अतूट विश्वासाचं
तू दिलंस मला नवी उमेद जगण्याची
वेळ प्रसंगी उभी राहणार तुझ्याचसाठी भीती नसणार मरणाची
तुझी माझी मैत्री जगावेगळी निराळी

स्नेहा माटूरकर
भंडारा