भारत माझा देश

Started by Rushi.VilasRao, August 15, 2019, 03:28:32 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

तब्बल दीडशे वर्ष स्वतःच्याच पाहुण्यांच्या तावडीत अडकलेला गुलामगिरीच्या बंधनात सापडलेल्या भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी कितीतरी क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आज त्याच भारताला स्वातंत्र्य मिळून नाही म्हणता म्हणता 72 वर्ष झाली आज भारताचे स्थान या जगामध्ये सर्वात प्रगतशील देशांमध्ये उच्च स्थानी मानले जाते गणले जाते पण तरीसुद्धा आज संपूर्ण भारतातल्या कुठल्याही एखाद्या रस्त्यावरून फिरताना याच प्रगतशील भारताचे काही असे लोक दिसून येतात जे स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबासाठी एक वेळेचे अन्न मिळवण्यासाठी जिवाचा आटापिटा करून काळजाच्या आकांताने एवढे परिश्रम करताना दिसतात एवढे हालाखीच्या परिस्थितीत दिसतात की हा विचार मनात यायला किंवा त्यावर  विचार करायला भाग पडतो की खरंच आपण आज किती प्रगतशील आहोत किंवा प्रगतीचा विचार हा प्रत्येकाच्या मनात स्वतः पुरताच मर्यादित झाला आहे का लहानपणी शाळेत शिकवली जाणारी भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा फक्त शाळेचा अभ्यास पुरतीच तेव्हा घोकंपट्टी करण्या पुरतीच मर्यादित होती का अशा या लोकांची परिस्थिती पाहून काही क्षणासाठी का होईना काळजामध्ये एखादी सुन्न करणारी भावना निर्माण न व्हावी एवढे आपण पाषाणहृदयी झाले आहोत का  आज कमीतकमी लोकांच्या मनात हा विचार तरी केला यायला हवा की आपण या भारताचे नागरिक आहोत कमीत कमी एक सामाजिक बांधिलकी म्हणून तरी किंवा आपण ज्या भारतात जन्म घेतला त्या भारतातल्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून तरी मदतीची किंवा करुणेची भावना जागी व्हायला हवी..... मी असं मुळीच म्हणत नाही की प्रत्येकाला प्रत्येकाची मदत करणे शक्य आहे किंवा ते करायचेच आहे किंवा त्यांनी केलीच पाहिजे पण आपल्यातल्या चार जणांपैकी दोन जण तरी मिळून एखाद्या गरजूंची किंवा हालाखीच्या परिस्थितीत असलेल्या एखाद्या व्यक्तीची मदत करू शकतो.... कमीतकमी आपण एवढे तरी करू शकतो की रस्त्यावरून जाताना एखादा व्यक्ती भीक मागताना दिसला तर त्याला दोन-चार रुपये देण्याऐवजी काहीतरी खायला देऊन त्याची भूक भागवण्याचा प्रयत्न करू शकतो नाहीतर मग रस्त्यावरून जाताना एखादी व्यक्ती कोणते तरी एखादी गोष्ट किंवा सामान विकत असेल तर आपल्याला शक्य असल्यास तात्काळ किंवा त्यावेळी त्याची आपल्याला गरज नसली तरी ते खरेदी करू शकतो कारण ते लोक भीक मागण्यापेक्षा कष्ट करणे पसंत करतात....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
प्रत्येक जण जर उठून सुटून स्वतःपुरता विचार करायला लागले तर भारत हा देश त्या देशातले लोक चार पैशासाठी स्वतःला कोणाकडेतरी गहाण ठेवायला कमी करणार नाही किंवा तसं करणे त्यांना भाग पडेल. सांगायचं फक्त एवढच आजचा प्रगतीच्या मार्गावर अव्वलस्थानी पोहोचायचे असेल तर प्रगतीच्या मार्गावर पुढे जाताना प्रत्येकाला सोबत घेऊन पुढे जायला हवे. हेच विचार हे सामाजिक बांधिलकी जर प्रत्येकाने आपल्या मनात रुजवली तर एक दिवस जसा भारत स्वातंत्र्य देश झाल्यासारखा सोन्याचा दिवस उजाडला तसा एक दिवस नक्कीच असा  येईल की प्रगतशील भारताचा प्रत्येक व्यक्ती प्रगतीच्या पथावर अव्वल स्थानी असेल आणि ते ही सर्व नागरिकां.सोबत...एकत्र एकजुटीने....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan