भेटली पुन्हा ती वृध्दापकाळी

Started by siddheshwar vilas patankar, August 17, 2019, 05:09:51 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

भेटली पुन्हा ती वृध्दापकाळी

एके दिवशी बागेमध्ये  :-*

दुरूनच ती न्याहाळत होती

लगडलेली हिरवी केळी   :o

मी रममाण नामस्मरणी

बैसलों टेकूनी बाकाला  :-X

अंतःपुरातून इशारा येता

डावा डोळा फडफडला  :P

तिने माळलेला मोगरा मजला 

बरेच काही सांगुनी गेला  8)

गत आठवणींचे बाष्प जमुनी

चष्मा थोडा ओला झाला  :'(

काचा झाल्या धूसर धूसर

नाद लागले खुळचट  :D :D :D

विस्मरण ते हरीनामाचे 

देठ पुन्हा तो हिरवट   ;D ;D ;D

वायपर लावूनी साफ केली

आठवण सारी काचेवरची  :police: :police:

हात लावूनी पुन्हा परखली

खाली लिंबू अन मिरची  ??? ???

धीर करुनी पुन्हा टाकले

पाऊल पुढले यौवनात  :)

थेरडी अजूनही भारीच दिसते

समाज गेला मसनात  ???

ओळखलंस का मला म्हणुनी

थेट बैसलों बाजूला  :-\

हात टाकुनी खांद्यावरती

जवळ घेतले मी तिजला  :-[

नजरेसाठी आसुसलेलो

झालो होतो आतुर  ::)

काठी घेऊनि हाणहाणले

फोडलं माझं टकूर  :'(

हरी हरी ते पुन्हा आठवले

मसनात गेले देठ सारे  :angel:

नको पुन्हा त्या कटू आठवणी

सांगुनी गेले मज म्हातारे   :angel: :angel:


सिद्धेश्वर विलास पाटणकर
सिद्धेश्वर विलास पाटणकर C