चणे खाऊन , साजरी दिवाळी

Started by siddheshwar vilas patankar, August 22, 2019, 06:31:48 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

पाव किलो चणे खाऊन

केली साजरी दिवाळी

मस्त फटाके फोडत सुटलो

हैराण झाले शेजारीपाजारी

पहिली आंघोळ येण्याआधीच

भिजवून ठेवले पाण्यात

मोड येऊनि मग हादडले

मजा आली पादण्यात

पुकपुक पुकपुक खेळ सुरु तो

बोंबलत सुटला *चा

पोलीस आले तरी थांबेना

मग झाला मोठा लोचा

उचलून टाकलं गाडीत मजला

तिथेही सोडली घाण

कसं घेऊनि जायचं याला ?

म्हणुनी पोलिसही परेशान

पुढे जाउनी शक्कल केली

त्यांनी घुसवला मागून कापूस

चणा धावला मदतीला ऐसा

जणू सर्वांचाच तो बापूस

कोंडूनी वायू पॉट फुगले

पुढे आला स्पीड ब्रेकर

खालून बंद म्हणून सारे वर आले

मग देत सुटलो ढेकर

क्षमायाचना मागत सुटले

पोलीस आले काकुळतीला

पुरे आता छळने आम्हाला

थांबवा वायूगळतीला

अहो पादून पादून मीच थकलो

तरी थकला नाही *चा

मलाच कळत नाही काय झाले आत

नक्की झालाय कुठे लोचा ?

एक म्हातारा हुशार निघाला

दिलं हिंगाचं पाणी प्यायला

सुईईईई फट करुन आवाज आला

मग गेलो हळूच आडोश्याला

तोंड लपवुनी मग बैसलों घरात

पाद्र्या चर्चेची आली लाट

दिवाळी चांगलीच अंगाशी आली

त्या चण्यांनी लावली वाट


{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}
सिद्धेश्वर विलास पाटणकर C