तिची खोडं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, August 25, 2019, 07:36:30 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तिची खोडं*

ती आली तिनं पाहिलं
सारं उध्वस्त होऊन गेलं
तिच्या इशाऱ्यावर मग
काळीज तडफडून मेलं

इशारा जीवघेणा तिचा
रघात सारं पांगून गेला
ज्या घराचा आधार होता
त्या घरात जीव टांगून मेला

असं तिचं वागणं
खटकतं होतं मनाला
आपलीच पीडा होती
हे सांगू आता कोणाला

तिचं सोडून जाणं
सारं काही मान्य होतं
प्रेमाचा खोटा आव आणण
हे मात्र मान्य नव्हतं

नजरा नजर भिडवनं
तिची ती खोडं होती
च्यायला प्रेम समजून बसलो
हीच गोष्ट मला पटत नव्हती

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर