चुगल्यांचा बाजार

Started by Lekh_swarga, September 04, 2019, 11:38:37 AM

Previous topic - Next topic

Lekh_swarga

आजची आपली ही चर्चा काही अतरंगी आणि सतरंगी होणार आहे कारण आपण यात एका वेगळ्या विषयाला स्पर्श करणार आहे तो म्हणजे......"चुगल्या.."
आता चुगल्या म्हंटल्यावर यात समावेश होतो सर्व मानवी गुगल्स चा . इकडून आणलेली महिती तिकडे चिपकवा आणि तिकडून आणलेली महिती इकडे चिपकवा । आणि ह्या चुगलीच्या बाजारात सर्वात मोठा समावेश असतो बायकांचा (फेमिनाईन जेंडर) चा .
होलसेल विक्रेता असतात या बाया ...
होलसेल पण कशाला मोफत विक्रेता असतात चुगल्यांच्या ..पोटात कोणती गोष्ट पचायची त नाहीच कधी......
एक तास आधी भेटलेल्या व्यक्तीला पण पूर्ण महाभारत , भगवतगीता ऐकवू शकतात एवढी क्षमता असते बायांत ..॥ आता त्यात पण असते एखादी बाई जिला काहीच काम नसतात फक्त आणि.... फक्त चुगल्या . तर बाजूला कोणत्या कुत्र्यानी घाण केली हे पण तिला विचारतात लोकं
एखादी व्यक्ती मरण जरी पावली तर त्याच्या मरणातही चर्चा कशाची ?  तर........आज बाजूच्या बाईचे तिच्या नावऱ्यासोबत भांडण झाल ...अरे इथे त्या माणसाची जीवनाची गाडी पूर्णपणे थांबली आहे आणि तुमची चुगल्यांची गाडी नॉनस्टॉप धावतच आहे .जसा सारा  संसाराचं चुगल्यात आहे . चुगल्यात आणि रिकामटेकड्या कामात तर यांची P.H.D झाली आहे....या कर्तृत्ववान बायांसाठी दोन ओळी लिहिण्याचा प्रयत्न करतो...     
   
नसतात काही कामं । नाही तोंडावर भान ।।
चुगल्यातच आहे संपूर्ण त्यांची जाण ।।
नाही पचत पोटात कोणतीही गोष्ट ।
स्वतही होतात आणि करतात दुसऱ्यालाही भ्रष्ट्।।
कधीतरी पचवा पोटात एकतरी गोष्ट ।
भांडण जगातील होतील पूर्णपणे नष्ट ।।
पूर्णपणे मिटवा ही चुगल्यांची खुट ।
संपूर्ण जग नक्कीच होणार एकजूट ।।