पितृ बने कावळा

Started by ujwal deshmukh, September 28, 2019, 03:23:11 PM

Previous topic - Next topic

ujwal deshmukh

पितृ बने कावळा 

पितृ अमावाश्या
औचित्य बघून
अवघे कावळे
धरणे धरून ......

रोज हाकलता
जवळ दिसता
बोलाविता आज   
पितर  बसता ......

खाऊन एवढे
लागे हागवण
इतर दिवशी
भुकेने मरण......

बनवत आम्हा 
एक दिन बाप
माफ करायास
अवघे ते पाप ......

दिन दुबळ्यास
द्यावे आज दान
वसते त्यांच्यात
पुर्वजाचे मन ......
  ...उज्वल देशमुख ...