रात्र सरताना

Started by Dnyaneshwar Musale, October 16, 2019, 11:29:26 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

अंधारात सुचतात मला कविता
हातात  लेखणी घेऊन
मग मी लिहु लागतो,
डोळ्यावर आलेली झापड
कधी उडून जाते ते ही समजतही नाही,
आणि दिसु लागतो
अर्ध्या भाकरीत पोटावर
उधार होऊन या कुशी वरून त्या
कुशीवर हुलक्या घेणारी गरिबी,

हल्ली फक्त रात्री गल्लीतल इवळांऱ्या
कुत्र्यांचाच आवाज ऐकू येतो मला,
पण त्याहूनही
कुजबुजणाऱ्या भिंतीच
रडत असतात एकल्या,
अनं
चावुन खात असते रात्र कोणाला
ती फक्त पोटासाठी.

जणु त्यांचाही कुणी जोडीदार हरवल्यागत,
चांदण्या दिसतात एकल्या
फिरताना,
जस जशी रात सरत जाते
तस तशी माणसातला माणुसपणा दिसतो जिरताना.

रात किडे आता रात्रीचे  किर किर करत नाही
त्याहुनही माणसंच करत असतात दिवसा ढवळ्या
किर किर जास्त,
म्हणुनच की काय बरी वाटते
रात्रच मस्त.

रामपाऱ्यात मग एखादी येते डुलकी
देईन जाते एक नवं स्वप्न,
वहीची पानं मोकळी करून
उगवणार  दिवस नव्या कवितेवर सोपतो.
अनं मी खुशाल झोपतो.