आपलेच होते

Started by शिवाजी सांगळे, November 06, 2019, 08:54:02 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आपलेच होते

सोबतीला सुखात लोक आपलेच होते
उचलण्यास लाभ लोक आपलेच होते

जावे कोणत्या दिशेला कळेना मनाला
लावण्यास वाटेस लोक आपलेच होते

घेण्या जावे कधी खुशाली स्वकीयांची
टाळण्यास तत्पर लोक आपलेच होते

हातून काही एक जराशीच चूक झाली 
दाखवण्यास बोट लोक आपलेच होते

अपघात झाला साधा अजाणता काही
ओढण्यास कोरडे लोक आपलेच होते

बहरताना यौवन हलकेच नजाकतीने
लुटण्यास आबरू लोक आपलेच होते

© शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९