Aakash

Started by vpbarde, November 19, 2019, 04:38:57 PM

Previous topic - Next topic

vpbarde

बचपन का वो खुबसुरत मोड पिछे रह गया ...
जिंदगी से मिलने चले थे हम..
मगर उस मोड पर ही जिंदगी मिली..
जहौ हमारा बचपना कही खो गया...

       आकाश.. एक दिवस बसल्या-बसल्या कवि गुलजार यांच्या कविता मोबाईलवर वाचत होते. सत्य आणि कल्पकता याचे सुंदर मिश्रण त्यांच्या कवितेत दिसुन येते. खुप दिवसांनंतर मनाला आल्हाददायक वाटणारं असं काही तरी वाचायला मिळालं. कधी तरी सहजच सुचल्या म्हणुन मी लिहिलेल्या काही ओळी आठवल्या.. कवी गुलजार यांच्या कवितांची सर त्याला येणार नाही . पण आपला छोटासा प्रयत्न.. आपल्या मनाचे समाधान.. रोजचा तोच कंटाळवाणा दिवस.. रोजच्या त्याच-त्याच कटकटी.. तीच गर्दी.. तोच गोंधळ... आणि प्रत्येकाची जगण्यासाठी तीच धडपड.. तीच जीवघेणी धावपळ.. आकाश.. मला तर या सगळया गोष्टींचा आता कंटाळा येतो.. असं वाटत काही वेळाकरिता कुठ तरी एकांतात जाऊन बसावे आणि आपल्याच श्वासाचा आवाज आपण ऐकावा.. शांतपणे... या गोंधळात आपण आपल्याच श्वासाची लय विसरुन गेलोय.. बहुधा एकांतात ती लय सापडेल...
      ओ.के.. मला नेमक काय म्हणायचं आहे ते शब्दात सांगता नाही येणार.. त्यातल्या भावना तुला समजल्या असतीलच..
      आकाश.. मघ्यंतरी मला एक खुप छान अनुभव आला... माझा चार वर्षाचा छोटा दोस्त माझी पर्स उचकत होता.. त्याला खेळायला ती फायर ट्रक गाडी हवी होती. पर्स उचकत असताना पैसे ठेवलेला कप्पा त्याने उघडला. अरे दे ती पर्स.. माझ्या कामाचं आहे ते.. पैसे आहेत ना त्यात.. असं म्हणुन मी त्याच्याकडुन पर्स घेतली.. तुला पैसे कशाकरता लागतात.. त्याचा प्रश्न... आकाश.. काय उत्तर देउ मी त्याला.. किती निरागस प्रश्न  होता त्याचा.. त्याला समजेल असे निरागस उत्तर माझ्याकडे न्हवते.. आपण उगीच मोठे झालो असं वाटायला लागंल मला.. व्यवहार म्हणजे काय ? तो कसा करतात ? का करतात ? अश्या प्रश्नाचे उत्तर मलाच अजुन सापडलेले नाहीत.. कदाचीत हा छोटा दोस्त मोठा झाल्यावर त्याला याचे उत्तर सापडतील.. 
        एकदा असेच रिक्शातुन जात असताना रिक्शात काही मुली होत्या.. आठवी-नववी च्या शाळकरी मुली.. बाहेर जोरदार पाऊस सुरु होता.. त्या मुलींनी काकांना रिक्शा थांबवायला सांगीतली आणि रिक्शातनं उतरुन जोरदार पावसात धमाल केली.. मनसोक्त भिजुन झाल्यावर पुन्हा घरी जाण्यासाठी रिक्शात बसल्या.. आकाश त्या दिवशी जगणं म्हणजे काय हे मी प्रत्यक्ष बघितलं.. खरंच आपणही असं मनसोक्त जगतो का ??? हमारा बचपन गया मगर बचपना नही असं म्हणणारे उत्साही मी बघितले आहेत.. त्या उत्साही मंडळींमध्ये मी सुध्दा आहे..
         आकाश... मला लहान मुंलाशी दोस्ती करायला खुप आवडतं.. त्यांच ते चॉकलेट.. आईक्रिम... बिस्किट... खेळण्या... आणि त्याचं ते तासा-तासाला कटटी-दोस्ती करंण.. पटकन रुसणं.. पटकन हसणं.. सगळं-सगळं खुप निरागस असंत..
        मोठी माणंस मात्र मतलबा पुरती  दोस्ती घेतात आणि आपला मतलब साधला की कटटी घेतात.. आयुष्याच्या पुस्तकातली लहानपणाची पानच पुन्हा-पुन्हा वाचावीशी वाटतात.. कवि गुलजार यांनी काही ओळीमध्ये माझ्या मनातल्या भावना शब्दात सांगितल्या आहेत.

ए उम्र दम है तो कर दे इतनी खता
बचपन तो छिन लिया.. बचपना छिन के दिखा..