मनातल

Started by vpbarde, November 19, 2019, 04:46:32 PM

Previous topic - Next topic

vpbarde

संध्याकाळची वेळ... रस्त्यावर खुप रहदारी होती.. कोणाला आपल्या घरटयात जाण्याची घाई.. तरं कोणी दिवसभर घरात कंटाळुन बाजाराचा फेरफटका मारायला बाहेर चाललेला.. मी मात्र माझ्या घरटयात जाण्यासाठी नेहमीप्रमाणे चालले होते..
        समोरुन ती येताना दिसली.. छान साडी नेसुन आवरुन नुकतीच घरातुन बाहेर निघाली असावी.. चेहरा मात्र मलुल वाटत होता.. चेह-यावर एक प्रकारची ग्लानी पसरलेली होती.. असं वाटत होत की तिला स्व:ताचेच ओझे खुप जड झाले आहे.. ते ओझे कशाचे होते ?? कोणत्या भावनांने ओझे होते.. राग.. हतबलता.. वेदना.. दु:ख.. की अजुन काही.. बहुधा राग.. प्रचंड राग.. न पटणा-या गोष्टी.. न आवडणारी माणसे... आणि अगदी स्व:तचा ही कधी-कधी प्रचंड राग येतो.. का.. कधी... कसे.. या प्रश्नांची उत्तर नाही सापडली की राग येतो.. हे असे का ?? उत्तर हवं असंत.. पण आपल्या बुध्दिला पटेल असे उत्तर कधीच मिळतं नाही.. आणि मग ती चिडचिड.. ती अस्वस्थता.. तो राग.. अश्या वेळेस कोणी तरी हवं असंत.. आपल्याला समजुन घेणारा.. आपल्या सगळया प्रश्नाची उत्तर त्याच्या जवळ नसली तरी मी आहे ना... काळजी करु नको.. हा विश्वास देणारा कोणी तरी...
       तीला मी ओळखत न्हवते.. पण का कोणास ठावुक मला जिच्याशी बोलावे वाटले.. तिला शांत करावे वाटले.. मी सहजच विचारले.. ताई किती वाजले.. बस कधी येईल आता.. तुम्हाला कुठे जायचे आहे..
      एका दमात तिच्याशी बोलुन मी शांत उभी राहिले.. तिचा चेहरा बदलला.. थेाडी नार्मलवर आल्यासारखी वाटली.. बसा.. दहा नंबरची बस येईल आता... मलाही याच बसने जायचे आहे.. असं म्हणुन तिने मोबाईल काढला आणि काहीतरी बघतं बसली.. ती नार्मल झाली होती... आता तिच्या मनातले वादळ मनातच विरुन गेले.. पाच मिनिटातच बस आली आणि त्या गर्दीत ती हरवुन गेली.. आणि मी माझ्या घरटयात..
       पण रात्री झेापताना छतावर फिरणा-या पंख्याकडे बघुन पुन्हा संध्याकाळी स्टांपवर भेटलेली ती अनोळखी बाई आठवली.. ती अजुन असे किती वादळ मनातल्या मनात दाबुन टाकणार आहे.. माहित नाही.. कदाचित हे काही क्षणांचेही असु शकते.. किंवा आयुष्यभराचेही ...
       इतक्या गर्दीतही तिच्या चेह-यावरच्या भावना आणि तिचा त्रागा मला जाणवला.. तिला शांत करण्यासाठी मी तिच्याशी काहीही कारण नसताना बोलले.. पण आता कळाले की मी मलाच शांत करतं होते.. माझ्या मनातले वादळं.. माझा माझ्याबदलचा राग.. हे सगळे तिच्या चेह-यावर वाचले आणि घाबरुन मी तिच्याशी बोलले..
      आकाश... असं होत असावं का ?? खरं तर त्या दिवशी मी माझ्यावरच खुप रागावले होते.. त्याच न आवडणा-या गोष्टी ... आजुबाजुच्या माणंसाचे न पटणारे वागणे.. हा चाललेला सगळा सावळा गोंधळ.. आपण काही करु शकतं नाही ही हतबलता.. या सगळयामुळे खरं तर मी चिडले होते.. पण शांतपणे स्टापवर उभी असंताना माझ्याच भावनांचे वादळ असे माझ्यासमोर आले.. आणि डोळयाची पापणी उघडण्याआधी गेले सुध्दा..       
       पुन्हा एक नविन दिवस येईल.. पुन्हा मनाच्या घरटयात भावनांचे एक नविन वादळ येईल.. पुन्हा तीच तगमग.. तीच स्व:ताला शांत करण्याची धडपड.. आणि पुन्हा सावरुन आलेल्या दिवसाचे हसत-हसतं स्वागतं ... 
      इथे जगणा-या प्रत्येकाची हिच कहाणी नव्याने सांगण्यासाठी पुन्हा भेटुयात..