जगणं माझं एक दिवसाचं

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, November 22, 2019, 10:39:13 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.जगणं माझं एक दिवसाचं*

जगणं माझं एक दिवसाचं
तू पण एकदा जगून बघ ना
मी वेडा मी खुळा अन भिकारी ही
पण एकदा तू मिठीत घेऊन बघ ना

अस्सल नगरी मी पण
पुरता संपलेलो तुझ्या श्वासात
तुझ्या प्रत्येक शब्दात अन
तू दिलेल्या प्रत्येक दुःखात

तू अन मी एक नाण्याच्या
दोन अखंडित बाजू
प्रेमाच्या बाबतीत मात्र
तू अन मी मोजमापाचा तराजू

तु निघून गेल्याच पत्र
पाखरू घेऊन आलं
दुभंगलेल्या नात्यात आपल्या
विरहाच्या झळा लागून ते ही मेलं

कोणाला सहन होणार गं
असला तात्पुरता लळा
प्रेमाची दोर सैल सोडली
अन कापला गेला गळा

बस्स आता पुरेसं झालं
मरणाचे दार आता उघडले
सरणाची सजवा सजव झाली
तुझ्या मुळेच हे विपरीत घडले

✍🏻(कविराज.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Gaurav Shinde

मार डाला मुझको तुने हाय हाय क्या दर्द हे
कविता  मे तेरे