मावळणाऱ्या दिवसासाठी

Started by Shamli, November 26, 2019, 10:30:12 PM

Previous topic - Next topic

Shamli

आज मी त्या पायवाटेने
पुन्हा निघाले
पुन्हा चालले
त्या मावळणाऱ्या दिवसासाठी

पायाला लागणाऱ्या रस्त्याची
आपुलकी तीच आहे
तिला तुडवत चालले आहे
त्या मावळणाऱ्या दिवसासाठी

मनातलं पाखरू कसं गप्पं गप्पं
दूरवर धूळ उडते आहे
मी ती डोळ्यात साठवते आहे
त्या मावळणाऱ्या दिवसासाठी

तो दिवस थकला आहे
तो आता विझणार आहे
पण तरीही मी चालतेच आहे
त्या मावळणाऱ्या दिवसासाठी
अन उद्या येणाऱ्या
कोवळ्या
किरणांसाठी....

-शामली
२९-१०-२००९