सपना

Started by vpbarde, December 10, 2019, 03:16:21 PM

Previous topic - Next topic

vpbarde

सच है के सपने कभी हकिकत नही हुआ करते..
मगर ऐसे दिल छोटा नही किया करते..       
     
        सकाळी चहा घेताना सहजच हया ओळी सुचल्या.. पुन्हा आज तीच रोजची काम.. तीच धावपळ.. आणि पुन्हा रात्रीचे चांदणे-चंद्र बघंत उदयाच्या दिवसाची जुळवाजुळव.. खरंच माझी स्वप्नं काय होती.. कशी होती.. आता कुठ गेली.. कशी हरवली.. मी काय करतीय.. कशासाठी करतीय.. मला काय हवं होतं.. आता या क्षणी माझ्यासमोर काय आहे.. असेच विचार माझ्या डोक्यात नाचानाच करायला लागले आणी मला हसुच आले. {आजकाल ना काही मनाविरुध्द झाले की मला हसुच येते... मग छानस हसुन मनाला खुश करायचं आणि पुढ जात राहायचं..} चला.. आज पुन्हा चंद्र आला की त्याला विचारु.. बाबा रे तु चोरले तरं नाहीस माझे स्वप्नं..       
       कधी-कधी ना अगदी शांत-शांत आणी अलिप्त रहावसं वाटतं. कोणाशीच डोक लावु नये असं वाटंत. कारण मुर्ख माणुस आपण काय सांगतोय हे ऐकुन तरं घेतो पण त्याला आपण का-कशासाठी सांगतोय हे समजतच नाही आणी अती शहाण्याला आपण काय सांगतोय कशासाठी सांगतोय हे समजतं.. पण अती शहाणपणामुळं तो त्याचाच हेकेखोरपणा चालवतं असतो.. म्हणुनच अलिप्त रहावं. बसं एक दिन अपना टाईम आएगा.. सोचने मे क्या जाता है..     
       आकाश.. तु राजकपुरचा आवारा बघितलाय.. जगाला "आवारा हुं.. या गर्दिश मे हुं आसमान का तारा हुं" अस बिनधास्तपणे सांगणारा राजु खुप साधा-भोळा आणि गबाळा वाटतो.. पण तो मवाली-टपोरी वाटतं नाही.. त्याच्या बिनधास्तपणात एक गोड अशी निरागसता असती.. दुनियादारी काय म्हणेल याची चिंता नसती.. आपल्यामुळे कोणी दुखावणार तर नाही याची काळजी असंती.. दुस-याचे अश्रु पुसुन त्याच्या चेह-यावर हसु कसे येईल याचा एक प्रामाणिक प्रयत्न करंत बिनधास्तपणे वावरणारा असा राजु आज कुठ तरी हरवुन गेलाय ना.. श्रीमंत दिलदार राजु या व्यवहाराच्या जगात मात्र गरीब झालाय.. पण त्या गरीबीतली दिलदार श्रीमंती अजुनही कमी झालेली नाही.. आवारा हुं हे गाण ऐकताना मला अजुन एक गाणे आठवले.. 
दिल जाने मेरे सारे भेद ये गहरे.. हो गये कैसे मेरे सपने सुनहरे..
ये मेरे सपने.. यही तो है अपने.. मुझसे जुदा न होंगे इनके ये साये..
कही दुर जब दिन ढल जाय.. सांझ की दुल्हन बदन चुराए.. चुपके से आए..
मेरे खयालो के आंगन मे कोई सपनो के दिप जलाऍ.. नजर न आए.
      एक दिवस माझा एक चार-पाच वर्षाचा छोटा दोस्त त्याच्या घरासमोर निवांत बसलेला दिसला.. ज्याच्या चेह-यांवरचे भाव खुप मोहक होते.. आता मी रिटायर्ड झालोय.. आता मी पुढचे आयुष्य कसे घालवु.. काय करु.. असे काहीसे प्रश्न घेऊन सकाळच्या वेळी त्याच्या घरासमोर बसलेला तो दिसला.. खुप घाईत असुन सुध्दा त्याच्याशी बोलण्याचा मोह मला आवरता आला नाही. सोना काय झाल.. असा का बसला.. त्याचा हात हातात घेत मी विचारले.. मला गुळ-तुप-पोळी हवी होती.. आईने दुध-पोळी दिलयं.. आता मी काय करु.. तो इटुकला जीव रुसलेला आणि गोधळलेला का आहे हे मला आता समजले.. मला हसु आवरेना.. त्याचा दुध-पोळी आणी गुळ-तुप-पोळीचा गहन प्रश्न सोडवायचा मी प्रयत्न केला.. त्याच्याच भाषेत समजावुन ती दुध-पोळी खाऊ घातली..
         छोटासा जीव.. छोटासा प्रश्न.. सहजच सुटला.. या छोटया-छोटया गोष्टींमुळेच आयुष्य मोठे होत असते.. छोटे-छोटे प्रश्न.. त्याचे सोपे-सोपे उत्तर.. छोटे-छोटे स्वप्न.. फक्त एक दृष्टीकोण हवा हे सगळं समजुन घेण्याचा.. त्यातल्या आनंद शेाधण्याचा.. 
       रोज सकाळी एक नवे स्वप्न बघायचे आणी संध्याकाळी त्याचे तुकडे उशाखाली घेउन झोपायचे.. आकाश आयुष्यात अजुन काय हवयं आमच्या सारख्या गरीब लोकांना.. याच गरीबीतले काही श्रीमंत स्वप्न घेऊन पुन्हा येईनच.. Life is Lovable & Interesting..