तुरीची झाप

Started by Dnyaneshwar Musale, December 10, 2019, 11:25:22 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

मळ्यात फुलला
तो तुरीचा झाप,
हसत हसत घेऊन तुरी
आल्या सोन्याचं मापं.

ऊन पावसाचा असे मार खुप
उठुन दिसतंय हिरवं गार रूप.
तुरीच्या सावलीत खेळ चाले
हा शेंगांचा,
झाकीती फोड काळ्या मातीच्या भेंगांचा.

शेंगेशी शेंग गाऊन बोले
झाप तुरीची वाऱ्याशी डोले,
सावलीत तुरीच्या माया काळ्या आईची मिळती,
माथ्याचा घाम माय बाप एका तुरीच्या झापेसाठी मातीत मळती.

अशा हसत हसत झापळल्या ह्या तुरी,
जणु अंगणात नाचत आल्या माहेराला पोरी.