एक वचन

Started by vpbarde, December 14, 2019, 12:37:42 PM

Previous topic - Next topic

vpbarde

इस दिल में नयी-नयी-सी उमंगे है..
इस दिमाग में दुनिया का डर..
बस एक खाली सा मकान दे मुझको जिंदगी..
दिवारो को बताउंगी हाल-ए-दिल.. अपनी सारी दुनिया समझकर..

       आकाश.. खुप काही सांगत असते ना मी.. काही मनाचं.. तर काही जनाचं.. खुप काही असंत आपल्या मनातं.. सगळंच शब्दात नाही मांडता येत.. फक्त समजुन घेण्याची ताकद मात्र हवी.. आकाश.. तुझ्यात ती ताकद आहे..
       आकाश.. आजुबाजुला किती आणि काय-काय घडतं असंत ना ? काही चांगल तरं काही वाईट.. देशाची ढासळणारी आर्थिक स्थिती.. वाढती गरिबी.. बेरोजगारी.. आजार.. वाढता भ्रष्टाचार.. रोज आत्महत्या करण्या-यांची वाढती संख्या.. तरुणांमध्ये वाढणारी व्यसनाधिनता.. नैराश्य.. नवविवाहितेचा सासरी होणारा छळ.. राजकारणातला सावळा गोंधळ.. शेअर घोटाळा.. बॅक घोटाळा.. वाढती लोकसंख्या.. डबघाईला आलेली शेती.. हि यादी मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढतचं जाईल..     
       पण या सगळयांमध्ये मला दोन महत्वपुर्ण समस्या जाणंवतात.. एक म्हणजे अनाथ मुलं आणी दुसरं मनोरुग्ण.. हे सगळे प्रश्न आपणचं निर्माण केलेले आहेत.. आणि या सगळया प्रश्नांची उत्तर आपल्यालाच शोधायची आहेत.. कोणी तरी पुढाकार घेईल आणि सगळ निस्तरेल असा विचार करण्यापेक्षा मीच पुढाकार घेवुन सुरुवात माझ्यापासुनच करेल असा विचार प्रत्येकाने केला तर सगळं काही खुप सोपे होउन जाईल.. एक विचार असाही येतो की, चीन-जापान इत्यादी आधुनिक देशामध्ये प्रत्येक क्षेत्रात कडक कायदे-नियम आहेत.. तेथील नागरिकही त्या कायदे-नियम यांची काटेकोरपणे अमंलबजावणी करतात.. भारत तरुंणाचा देश आहे असं आपण म्हणतो.. मग चीन-जापान प्रमाणे कडक कायदे-नियम करायला आणि त्याची अमंलबजावणी करायला काय हरकत आहे ? तेच-तेच साचेबध्द विचार आणि तीच जगण्याची ठरलेली एक चौकट.. या चौकटीपलीकडेही एक निराळ जग आहे.. प्रगती आहे.. सुदंरता आहे.. स्वच्छता आहे.. हे आपल्याला कधी समजणार.. कधी दिसणार ? काही मोडकळीस आलेल्या परंपरा थोडया बाजुला ठेवुन आपल्याला काळाप्रमाणे चालता नाही का येणार ?
        काही दिवसांपुर्वी एक अत्यंत लाजीरवाणं चित्र बघण्यात आलं.. पुलाखाली फाटक्या कपडयातला एक २५-२६ वर्षाचा तरुण दारु पिऊन लोळत पडलेला होता.. शेजारी एक कुत्रे काहीतरी चघळत बसले होते..
        एकीकडे अभिजित बॅनर्जी सारखी बुघ्दिमान लोक गरिबी कमी करण्यासाठी उपाय शोधत आहेत.. नोबेल प्राईज मिळवत आहेत.. आणि एकीकडे सामान्य तरुण असा वाया जात आहे.. व्यसनांच्या आहारी जांत आहे..
        आपण भारतीय आहोत.. आपली एक अशी श्रेष्ठ संस्कृती आहे.. भारतीय असण्याचा मला अभिमान आहे.. पण चीन-जापान-अमेरिका या आधुनिक जिवनशैली असलेल्या देशातल्या नागरिकांकडुन नियमांचे काटेकोर पालन करतं एक शिस्तबध्द-स्वच्छ-सुंदर आयुष्य कसे जगायचे हे खरोखर शिकण्यासारखे आहे. काही नकारात्मक तरं काहीसे सकारात्मक अश्या प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजु असतातच.. आपल्याला पटेल-रुचेल-पचेल-झेपेल असे आपण जरुर घ्यावे आणि काळाच्या पाउलावर पाउल ठेवुन चालावे.. आपण भारतीय तत्वनिष्ठ आहोत हे मान्य.. तत्त्वाला मुरड घालुन काही करणे आपल्याला पटत नाही.. पण ईतर प्रगतीशिल देशांच्या यादीत आपला क्रमांक वरचा असेल एव्हढी ताकद आपल्यामध्ये नक्कीच आहे..   
      आज सकाळी घराच्या खिडकीवर एक कबुतर बसले होते.. आपली मान तिरकी करतं ते आकाशाकडे बघतं होते.. उंच झेप घ्यायची होती त्याला.. पण माझ्याकडे बघुन तो थांबला.. कदाचित माझ्याकडुन त्याला एक वचन घ्यायचे असेल.. स्वच्छतेचे-सुंदरतेचे-प्रगतीचे-नव्या जगाचे......   
आकाशाचा आकाशी रंग माझ्या मनाच्या आकाशात उतरला..
तुही आकाशी उंच उड.. असे सांगुन तो पक्षीही आकाशमय झाला..