प्रिंटर

Started by siddhesh 68, December 21, 2019, 11:10:09 PM

Previous topic - Next topic

siddhesh 68

प्रिंटर

जरी बनलो असलो मी प्लास्टिक चा
तरी वाचवतो तुमच्या डोळ्यावरचा ताण
समजतात मला साहेबाची मनमानी
तर गांधी टोपी घातलेल्या क्लर्कचा मी जीव की प्राण

इको फ्रेंडली वाले टाळतात माझा वापर
तरी मोबाईल व लॅन दोन्ही वरून होतो मी कॉन्फिगर
किती कागद प्रिंट झाले नाही कोणाला देणे घेणे
ऑफिस मधील कामकाजाला नाही म्हणत कोणी उगाच कागदी घोडे

जुन्या पिढीला वाटतो मी सोयीस्कर
नवीन पिढीला प्रॉब्लेम नाही म्हणण्यात मला श्रेयस्कर
लेडीज चा मात्र नाही मी फारसा लाडका
अशी हि ऑफिशियल प्रणाली
जेन्टस मायनस लेडीज तरी वर्क डन हिच माझी खुबी

कोणाला वाटतो मी टाईपरायटर ची औलाद
कोणी म्हणतात साधा भोळा, तर काही वेळेस फटाक्याची वात
किती साहेब आले आणि गेले
तरी हार्डली बदलते माझे लोकेशन
मला जास्ती वेळा हात लावा आपोआप येईल तुमच्यात परफेक्शन

तर असा मी तुमचा सोबती
काहींचे भूषण तर काहींची बाब लाजीरवाणी
मला नाही त्याचाशी कर्तव्य
जो माझा मी त्याचा हेच माझे वास्तव आणि तेच माझे ध्येय

सिद्धेश सुधीर देशमुख
८५५४८०६८७९