गाथा ट्रॉयची

Started by siddhesh 68, December 23, 2019, 10:52:40 PM

Previous topic - Next topic

siddhesh 68


गाथा ट्रॉयची

ऐका हो ऐका
गाथा ट्रॉयची
त्याच ट्रोजन युद्धाची

भूमध्य सागर किनारी
होती अति सुंदर ट्रॉय नगरी
प्रायम  राजा राज्य करी
नगरीला होती उंच चिरेबंदी

प्रायम  राजा होता देवभोळा
प्रजाहितदक्ष आणि रूढीवादी 
समुद्रापलिकडे होते बेटांचे ग्रीस
हुकूमत होती निर्दयी एगमेमनॉनची
ज्याच्यासमोर संघराज्यांचे  चालत नसे काही

तर झाली गोष्ट अशी
धाकटा ट्रॉय राजपुत्र पॅरिस
याने पाहिले हेलनला - एगमेमनॉनच्या वहिनीला
बघताक्षणी झाले प्रेम दोघांमध्ये 
मेनेलौसपत्नी आली पळून ट्रॉयला पॅरिस चा हात धरून

आता प्रायमची होती एगमेमनॉनशी गाठ
येऊन धडकली ग्रीक सेना ट्रॉय किनारी घेऊन हजार होड्यांचा ताफा
मेनेलौस पॅरिस यांच्यात होणार होते खुले द्वंद
तरी थोरला प्रायमपुत्र हेक्टर पडला मध्ये आणि मेनेलौसचा झाला अंत

तर असे युद्धाला फुटले तोंड
रोज बाणांचे वर्षाव, तालवारींचा खणखणाट आणि रक्तबंबाळ करणारे घाव
दोन्ही बाजूंनी पडू लागले अनेक वीर धारातीर्थी
तरी महान ग्रीक योद्धा अखिलीस आणि हेक्टर यांची पडायची होती गाठ

तर अश्या युद्धात एके दिवशी
अखिलीस बंधू  पेट्रोकलंस याला कोणीतरी चढवला अखिलीसचा पेहेराव 
पेट्रोकलंस आला रणभूमी वर हेक्टर सामोरी
हेक्टर समजला त्याला अखिलीस आणि केला वार जिव्हारी
पुढे अखिलीस हेक्टर यांच्यात झाले द्वंद्व
हेक्टर पडला धारातीर्थी
पोरका झाला प्रायम आणि पोरकी त्याची ट्रॉय नगरी

ग्रीक सेनेला आता फक्त ओलांडायची होती चिरेबंदी
केली त्यांनी युक्ती भारी
रोगराईच्या साथीची पसरवली अफवा
सोडले काही मुडदे, देवपूजा म्हणुन बांधला एक उंच लाकडी घोडा
लपून बसली सेना पाहत ट्रोजन सावजाची वाट

प्रायमने पाहिला  घोडा
वाटले त्याला संकट टळले देवकृपेने
आणला वाजत गाजत चिरेबंदीच्या आत तो लाकडी घोडा 

ट्रोजन युद्धाला इथंच कलाटणी मिळाली
घोड्यात लपलेल्या मुठभर ग्रीक योध्यांनी
रात्री पहारेकऱ्यांवर केले वार, उघडला आतुन दरवाजा 
चढले चिरेबंदी वर केला इशारा ग्रीक सैन्याला

रात्र प्रहरी बेसावध ट्रोजनांवर ग्रीक सैन्याची लाट चालून आली
सुरु झाली जाळपोळ, हत्या आणि हाहाकार
सुटले नाहीत राजवाड़े, मंदिरे आणि सोन्याचांदीची दुकाने

हातघाईच्या लढाईत प्रायमचा केला एगमेमनॉनने अंत
हेक्टरच्या पत्नीने दाखविले शौर्य एगमेमनॉनवर केला प्राणघातक वार 
अखिलीस ठरला आज कमनशिबी
पॅरिसने केला त्याच्या पायावर बाणाने वार
परांगदा झाले पॅरिस, हेलन आणि निवडक ट्रॉयवासी
ग्रीक सैन्याने केली ट्रॉय नगरी राख

तर अशी गाथा ट्रॉयची
खरंच घडली, अंध होमर ने शब्दबद्ध केली
ओळख पश्चिमी सभ्यतेची
तुलना नसे ही आपल्या किंवा त्यांच्या संस्कृतीची
तर गोष्ट हि मनुष्यजातीच्या
प्रेमाची, पराक्रमाची, धर्माची, हिंसेची व तत्वनिष्ठेची ।


सिद्धेश सुधीर देशमुख