नोंदवही

Started by Dnyaneshwar Musale, December 25, 2019, 02:42:40 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

प्रत्येकाची आयुष्याची नोंदवही वेगवेगळी असते,
कुणी आयुष्याचा भत्ता
तर कुणी आठवणींचा कित्ता साठवुन ठेवतो.
जमलंच तर कुणी
साधी सुधी वितभर स्वप्न गाठतं,
तर कुणी सारं आयुष्य दुसऱ्यासाठी वाटतं.
कुणा रोजच रहाट गाडग ओढताना
जगण्यासाठी  वेळ नसतो,
तर कुणा जगण्यासाठी
सारं आयुष्य असत,
तरी पण रोज आयुष्यातल्या प्रश्नांची यादी
वाढत जाते,
उत्तरांचा संदर्भ लागतच नाही
शेवटी सारा बोजा नोंदवही
स्वतःवर घेते,
एकदिवस ती ही स्वतःचे तोंड दाबुन गप्प होऊन
रद्दीत येते,
मग राहिलेली
आयुष्याची गोळा बेरीज वजन नसतानाही रद्दी म्हणुन
किलोवर मोजली जाते.