युरोप सफारी

Started by sacgodbole0604, December 26, 2019, 07:24:01 PM

Previous topic - Next topic

sacgodbole0604

युरोप सफारी

चला निघुया युरोप सफारीला
शांगेन व्हिसाची तयारी करुया
विमानाची तिकीट तयार ठेवा
होटेल्सच बूकिंग करुनच जा

प्रथम जाऊ हिटलरच्या देशात
मुनिच पासुन सुरुवात करुया
भव्य राजवाड्यांची सफर करूया
ओक्टोंबर बिअर फेस्टिव्हलला मजा करूया

मग जावुयात नुरेंबर्गला
ख्रिसमस मार्केटला ग्लु वाइन पियुयात
ट्राममधे बसुन नाझी गार्डन फिरुयात
किल्ल्यावर फिरून मजा करुयात

आता जावु बर्लिनला
इतिहासाचे साक्षीदार व्हायला
तुटलेल्या भिंतीचे अवशेष बघून
जर्मन नागरिकांना सलाम करूयात

आता प्रवेश करु फ्रान्स देशात
आयफेल टॉवरवर उंच जावुयात
प्यारीसची सफारी बोटीतून करून
मुझीयमस् आणि चर्चला भेट देवुयात

आता फिरुयात स्वित्झर्लंडला
झुरिच, लुझेर्न आणि जिनेव्हाला
माउंट टीटलिसवर बर्फात खेळुयात
काचेच्या ट्रेनमधून आल्प्स फिरुयात

पुढे जावु ऑस्ट्रिया देशात
साल्झबर्गला आणि व्हियन्नाला
झुगस्पीट्ला उंचीवर जावुन
पर्वतरांगांची मजा लुटुयात

आता जावु इटलीला
रोम, व्हेनिस आणि फ्लोरेन्सला
पिसाचा मनोरा डोळ्यात साठवुन
इटालियन पिझ्झा नक्की खावुयात

एप्रिल महिना हॉलंड मधे
टुलीप फेस्टिव्हलचा चमत्कार अनुभवायचा
ॲम्स्टरडॅमच्या कनोलमधे फिरून
विंडमिल गार्डन न चूकता जावुयात

चला निघुया पर्यटनाला
सुंदर युरोपची सफारी करुया
मदत लागली तर मला विचारा
कविता आवडली तर जरूर कळवा

सचिन
Mobile 8605697161