New Year

Started by vpbarde, January 03, 2020, 05:39:14 PM

Previous topic - Next topic

vpbarde

       पुन्हा एक नविन वर्ष्.. पुन्हा तोच दिवस एक नविन तारखेसह.. नविन वर्षासह.. पुन्हा तेच रहाटगाडगे.. त्याच रोजच्या अडचणी.. तेच मान-अपमान.. तेच सण-वार.. तेच वाढदिवस.. मित्र-मैत्रीणींची तीच मैफिल..  फरक फक्त तारखांचा..
       खरं तरं मागचे वर्ष् खुप छान गेले.. बाहेरच्या जगात खुप काही घडले-बिघडले.. पण माझे अंर्तमन मात्र शांतच होते.. खरं तर एक प्रकारचा अलिप्तपणांच होता.. अजुन एक प्रगतीचे पाउल म्हणजे या मनामध्ये-अंर्तमनामध्ये जो एक आत्मविश्वास असतो त्याच्याशी माझी चांगलीच गटी जमली.. सुंसवाद साधता आला.. स्व:ताकडं अलिप्तपणे बघता आलं.. स्वताला ओळखता आलं..
      मागच्या वर्षाकडे वळुन बघताना ज्या गोष्टी लक्ष्यात आल्या त्या म्हणजे कचराकुंडीत इटुकले जीव सापडल्याच्या बातम्या पेपरमध्ये सतत चमकत होत्या.. आणि येण्या-जाण्याच्या रस्त्यावर वेडयांची गर्दीही वाढतंच आहे असंही एक लक्षात आले.. (हे सगळं कधी संपणार आहे माहित नाही..)
     मागच्या वर्षी काही पुस्तक आणि काही लघुकथा वाचनात आल्या.. मानवी मनाचे वेगवेगळे पैलु समोर उलगडत गेले.. काही चांगल्या मुव्हीज बघण्यात आल्या.. पुन्हा-पुन्हा बघितल्या.. खरचं एक चाकोरीबाहेरचे विश्व आणि माणसाचे चौकटीबाहेरचे जगणे बघुन थक्क व्हायला होत.. तारे जमीन पर.. बर्फी.. वेक-अप-सीड.. दृष्यम..थ्री इंडियट.. द डर्टी पिक्चर.. अश्या सत्य आणि कल्पकता याचे मिश्रण असलेल्या हया काही मुव्हीज पुन्हा-पुन्हा बघितल्या तरी नव्या को-याच वाटतात.. खुपश्या मुव्हीज अजुनही बघायच्या राहुनच गेल्या आहेत..
     अमृता प्रितम.. विजया राजाध्यक्ष.. गुलजार.. सुधा मुर्ती.. हे लेखक तरं कमालच करतात.. हया लेखकांच्या लघुकथा वाचुन एक बधिरता येती... खुपश्या कथा आणि त्यातले पात्र डोक्यात धुमाकुळ घालत असतात.. अरुधती रॉय ही एक लेखिका खुप चर्चेत आली.. तिच लिखाण निवांत क्षणी वाचावे लागेल.. द गॉड पार्टीकल्स हे अरुंधती रॉयनी लिहिलेलं पुस्तक खुप चर्चेत आलं.. आपल्याला हलक-फुलंक बघण्याची-वाचण्याची सवय असते.. काही पुस्तक आणि मुव्हीज एक गंभीर चेहरा घेऊन आपल्याशी बोलत असतात.. ते सगळंच आपल्याला समजेल असं नाही.. पण काहीतरी वेगळा विचार करायला लावेल हे नक्की..
      मागच्या वर्षी काही वेळेस मुदाम ठरवुन मी अनाथ्आश्रमात गेले आणि थेाड काही जमेल ते देत गेले.. पण त्यात परोपकारापेक्षा माझाच स्वार्थ जास्त होता.. आपण खुप चांगले-पुण्याचे काम करत आहोत हा भाव होता.. हा अभिमान होता.. शेवटी माझे मलाच अपराधी वाटले आणि मनोमन मी ठरवुन टाकले की काहीही करायचे असेल तरं निस्वार्थ भावनेने.. निष्पाप मनाने करायचे.. त्याचा अहंकार नको.. उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला कळता कामा नये..
       ओ.के. मध्यतरी एक खुप सुंदर प्रेमकथा फेसबुकवर वाचण्यात आली.. दोनवेळच्या अन्नासाठी.. पोटासाठी तर सगळेच धडपडतात.. पण प्रेमासाठी जगणे म्हणजे काय असते.. हे त्या कथेमध्ये खुप छान प्रकारे मांडले होते.. नुकताच साखरपुडा झालेले एक जोडपे.. मैत्रीणींसोबत ती बाजारात खरेदी करतं असताना अपघात होतो आणि ती कोमात जाते.. दोन वर्ष हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊनही सुधारण्याचे काहीच लक्षण नसते.. तरी सुध्दा तो तिच्यावरच्या प्रेमापोटी हॉस्पिटलमध्येच तिच्याशी लग्न करतो आणि तिला घरी आणतो.. एका सेपेरेट रुम मध्ये अगदी हॉस्पीटलसारखी तिची सोय करतो.. तिला आवडणारे म्युझिक तिच्या रुममध्ये लावतो.. ती कोमात असुनही तिच्यावरच्या प्रेमामध्ये काहीही फरक पडत नाही.. पोटासाठी काम मागणारी एक तरुणी त्याच्या घरात येते.. ती हे सगळ बघुन खुप हळवी होते.. चकित होते.. अपार्टमेंटच्या पार्किगंमध्ये बसुन ती लहान मुलीसारखी रात्रभर रडतं असते.. कोमामध्ये असलेल्या त्या भाग्यशाली जिवाचा तिला हेवा वाटतो.. माणसांमधला राक्षस तर आपण प्रत्यक्ष नेहमीच पाहतो.. वाचतो.. ऐकतो.. पण माणसामधला देव मात्र हया लघुकथांमधुन का होईना दिसतं असतो..   
         या वर्षी सुध्दा खुप काही घडेल-बिघडेल.. आपण मात्र भेटतच राहु.. बोलत राहु.. इथेच.. याच ठिकाणी.. So Many Things in one Plateform....

माझी सुध्दा एक सुंदर प्रेमकथा आहे..
शिंपल्यातल्या मोत्यासारखी मौल्यवान आहे..
ख-या मोत्याची माळ गळयात शोभुन दिसते..
पण माझी प्रेमकथा बंद मुठीमध्येच हसत असते..