पतंग

Started by siddhesh 68, January 15, 2020, 04:39:52 PM

Previous topic - Next topic

siddhesh 68

पतंग

पतंग मी उडतो नभात
माझा मांजा तुमच्या हातात
कागदाचा मी बनलेला
माझ्यावर नक्षी रंग किंवा पोस्टर आखलेला

उडायला लागतो मला वारा
तरी असेल तुमच्यात हूनर
द्याल तुम्ही ढील ओढाल मला वर
जमिनीवरून छेदाल आकाश भिंगरीवर

आकाशात मी असताना करू शकता कापाकापी
कधी कटेल मी कधी बाकी जे आवती भोवती
खाली पडताना येते अजुनच मजा
पोरांना पाहिजे मी न फाटलेला व सगळा मांजा

संक्रांतीचा मी सोबती
माझी शेपटी शोभेची
भरारी घेतो मी उत्तुंग
नाही तर येऊन पडतो जमिनीवरती

मकर संकरांतीच्या हार्दिक शुभेच्छा

-सिद्धेश सुधीर देशमुख