चित्र

Started by शिवाजी सांगळे, January 24, 2020, 10:36:19 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

चित्र

हिम बरसले न् भान हरपून गेले
चित्रच सारे क्षणात बदलून गेले

धुके भोवती सजले जाळे दवाचे
सृष्टीस साऱ्या येथे भिजवून गेले

गारठल्या वृक्ष वेली सजीव सारे
धवल गिरी मनाला मोहवून गेले

उंच सखल आरस्पानी वाटेवरती
पडदे पारदर्शी रांगा सजवून गेले

आसमंत वरी चौफेर धरणी सारे
एकमात्र शुभ्र रंगात न्हाऊन गेले

© शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९