आई

Started by Shivani Vakil, January 27, 2020, 07:04:36 PM

Previous topic - Next topic

Shivani Vakil

        आई

आई तुझ्या असण्यामुळे
आहे मिळाला जन्म हा
शतदा जरी फेडू तरी
कमी पडेल माझा यत्न हा

तू वेचिल्या कष्टांची
गायिली जरी महती
नाही कशासी होते
त्याची तरीही गणती

हातासी धरुनी तू
शिकवलीस मम भाषा
संस्कार ही दिले तू
दाखवलीस मम दिशा

सांभाळले मला तू
जीवाच्या पलीकडे
फेडू कसे तूझे मी
हे पांग हेच कोडे

तू ऐकमेव आहे
वात्सल्य-त्याग-मूर्ती
हा जन्म वाहीला मी
तूझ्याच पावलांवरती

            -शिवानी वकील