शाळा

Started by Shivani Vakil, January 28, 2020, 10:47:06 AM

Previous topic - Next topic

Shivani Vakil

     शाळा

आरंभ जीवनाची
सुरूवात होई बाळा
शिशुवर्ग चिमुकल्यांचा
म्हणती तयास शाळा

असते सरस्वतीची
प्रतिमा तिथे सुरेख
विद्यार्थी जिवनाचा
तो खरा श्री गणेश

लाभतो आदर्श शिक्षकांचा
नित्य सहवास जेथे
दुसरे नाव त्यासी
आलय...विद्येचे

संस्कार अन् विद्येचा
घडतो मिलाफ येथे
असतो जिथे ऊद्याचा
गुणी नागरीक जेथे

येथील शिक्षणाने
होती बालके हुशार
पुढील शिक्षणाचा
पायाच आहे थोर

लडीवाळ बालकांनो
द्या शपथ एक जराशी
सु-किर्ती दूर पसरवा हो
विद्या-विद्यालयाची

     -शिवानी वकील