हास्य

Started by Shivani Vakil, January 30, 2020, 09:33:51 AM

Previous topic - Next topic

Shivani Vakil

        हास्य

माणसाच्या सुखाचं
व आनंदी रहायचं
एकमेव रहस्य
ते म्हणजे हास्य

माणूस होताना तयार
देवाने दिली त्याला अक्कल
माणसाने पण विचार
करून लढवली शक्कल

म्हणाला तुम्ही मला दिली
विचार करायला बुध्दी
पण विचार करून करून
डोक्याची करू कशी शुध्दी

विचारांनी होईल डोक्याचा भुगा
यावर काही ऊपाय असलाच तर बघा

देव म्हणाला
ऊपाय देतो खास
जास्त ताण झाला
तर जरासा हास

तुझ्या सर्व तणावांच
आहे हेच ऊत्तर
हसत राहिलास
तर तुला आयुष्य
आहे एकशे सत्तर

         -शिवानी वकील

Avma

छान आहे! 👍

Pranjalikb