तुझ्याविना आई...

Started by Tejaswi Mohite, February 16, 2020, 05:13:22 PM

Previous topic - Next topic

Tejaswi Mohite

तू सोडून गेलीस गं आई...सरून गेले दोन वर्षे आता
आजही तुझी आठवण मन कासावीस करून जाते...
आजही तुझी आठवण जीव बैचेन करून जाते..
नंतर माहित नाही कसे 
तुझे हात पाय गाळले
खचली तू अन् तुझ्यामागे
कायमचे अंथरुण लागले..
जणु तुझी जगण्याची 
ईच्छाच होती मेली
मरणाकडे डोळे लावून 
वाट पहात राहिली...
.सगळ्या गोष्टी मला शिकवून गेलीस..काय चांगलं काय वाईट तुझ्यामुळे तर शिकले मी.. घरात तशी सगळ्यात मोठीं अन संगळ्यांची आई तूच तर होतीस..तुझी उणीव अजूनही भासते..एका मायेची जाणीव करून देते..
विधात्याचा क्रूर सारा खेळ असा झाला..तुझ्याविना तो मला पोरकं बनवून गेला..
आई...एकांतात बसते ग पुसत डोळ्यातल पाणी..तुझी प्रेमळ हाक अजून येते गं कानी... आई म्हणजे काय हे आई झाल्यावरच कळतंय गं.. सगळ्यांना जीव लावून पण कोणीतरी मलादेखील "बाळा"म्हणावं म्हणून मन आतुरतंय गं...मला आई म्हणणारे खूप आहेत गं..
सगळ्यांचे हट्ट पुरवायला सक्षम आहे मी..
‌पण आई माझं काय गं... माझा हट्ट पुरवणारी आई च नाही माझ्याजवळ..मी आता कोणाला आई म्हणू गं.. मी आता कोणाजवळ हट्ट धरू गं... मुकले मी माझ्या मायेच्या आधाराला..प्रयत्न करेन अजूनही तुझ्यासारखच बनण्याचा... कितपत जमेल माहीत नाही तुझी सर काय मला यायची नाही...पण तुझी छबी माझ्यात दिसावी असं मला राहायचंय..नाही गं आई तुझ्या प्रेमाला कसली तोड..
तुझ्या मायेएवढी कुठलीच गोष्ट नाहीं ग गोड..कोणाला न समजणार तू एक कोड होतीस..
वाईट तर इतकंच की गं तुझा विरह अजूनही सोसत नाही...तूझी आठवण येताच कंठ दाटून आल्याशिवाय राहत नाही...अश्रूंचा बांध फुटला जातो पण कितीही काही झालं तरी तू परत नाहीस येणार म्हणून जिव तिळतिळ तुटतो...तुझ्या आठवणींनी तर मी अजूनही रडते..तुझी आठवण काढत काढत ओल्या डोळ्यांनी झोपते....नाही होत खरं पण एक भास मला देऊन जा
तुझ्या मायेच्या पदराखाली मला घट्ट मिठी मारून जा...♥️

                      - तेजस्वी शिवाजी मोहिते..

(कोणीतरी विषय द्यावा न त्याच्यावर सुचलेलं असं काही व्यक्त होणारे भाव)

Vaibhav Aher

खूप छान , उत्तम लिहिता आपण। :)