आई

Started by neha.hatekar, February 24, 2020, 12:01:56 AM

Previous topic - Next topic

neha.hatekar


          - आई -

आत्मा आणि ईश्र्वर यांचा
संगम म्हणजे आई
प्रेम आणि आपुलकीचा
महासागर या जगतावर नाही....

दुखः आपल्या ओंजळीत
घेऊन सुखाची फुले उधळते
रात्रंदिवस मात्र ती सूर्यासारखी तळपते

दिव्याप्रमाणे राहते ती स्वतः अंधारात
प्रयत्नरत असते सारखी
आपले आयुष्य जावे प्रकाशात

रागवते आपल्याला तेव्हा
आत्मा तिचा दुखतो
मुखातून आशीर्वादाचा
झळा खळखळ वाहतो

सांगताना तिचे महात्म्य
आयुष्य अपुरे पडेल
कितीही जन्म घेतले तरी
आई तुझे ऋण कसे हे फिटेल??
                       - नेहा हातेकर