मैत्रिंगण

Started by Pranav Wani, March 02, 2020, 08:45:50 AM

Previous topic - Next topic

Pranav Wani

*मैत्रिंगण*

तिचे उत्तर 'नाहीच', हे तर जणू जन्मताच माहित होतं...
पण काय झालं काय माहीत,
कदाचित आजू बाजूचे जोडपे बघून
12 हत्तीचं जसं बळ येतं तसं,
तसं 12 जोडप्यांच बळ आलं,   
आणि बोलून टाकलं सगळं...
हाथ थरथरले, घाम आंघोळ घालत होता...
छाती फुटण्याच्या मार्गावर आली,
कसले कसले विचार मनात आले,
'ती घाबरेल, ती रडेल, बोलणं सोडेल, घरी सांगेल, आणि शेवटी काय तर मार पडेल'

पण तिने सगळं सावरलं, मला सावरलं,
"उत्तर तर नाहीच होतं म्हणा"
नेहमीप्रमाणे मुलीनचं जे वाक्य असतं ते ही तिने घेतलं,
"तूला कोणी तरी चांगली मिळेल वगैरे"
असो,
बराच समजावून सांगून झाले,
माझे तिला, तिचे जरा जास्तच मला,
शेवटी प्रमाणिक मैत्री करायची सुनावणी झाली,
आणि मी ती तेव्हा मान्यही केली...
सुरळीत सुरू झाले
देवाच्या नव्हे तर तिच्या कृपेणे...
पुढे जरा वळण आले,
पावसाच्या थेंबातून कधी कधी जश्या गारा ही पडतात,
तसं माझं प्रेम बाहेर पडत होतं आणि मैत्रीला ला त्याचे फटके बसत होते...
आता पुन्हा विचारावसं वाटलं ,'तू माझ्याशी लग्न करशील?'
पुन्हा पुन्हा, जो पर्यंत हो येत नाही तोपर्यंत,
आणि शप्पत मानापासून हा,
कुठलाही वाईट स्वार्थ नाही...
"पण तू पुन्हा पुन्हा  'नाहीच' म्हणशील,
कसली वेडी स्वप्न बघत बसलो,
स्वप्नात सुद्धा हरलो राव...

मैत्री आणि प्रेम ह्यात रेंगाळत बसलो,
तू मात्र मैत्रीच्या रिंगणात शांत बसलीयेस...
माझा तर एक पाय ह्या रिंगणात आहे आणि दुसरा रिंगणाबाहेर
तुला खेचून तर नाही आणू शकत ना मी बाहेर...
भीती वाटतेय आता,
ह्या रिंगणातून तू मला फेकून देण्याची,
आणि तू विसरून जाण्याची की मी कोण आहे, कोण होतो...
कधीही न संपणाऱ्या माझ्या मनातल्या भावनांना खिशात कोंबून का होईना, या मैत्रिंगणात मला शांत बसायचं,
बसू दे..."


-प्रणव वाणी (प्रमो)