खरंच, तु थांबायला हवे होते..

Started by Falguni Dhumale, March 10, 2020, 12:29:06 AM

Previous topic - Next topic

Falguni Dhumale

का तुला कळू नये ? माझ्या ह्रदयाची व्यथा..
तू असा जायला निघालास, थांबवू तरी कसे आता..?
कधी-कधी वाटते, रडण्याचा आवाज तरी यायला हवा होता..
निदान, ते एकूण तरी तू वळला असतासं..
माझ्याकडे बघून, मनापासून स्फुरला असतासं..
कशी गं तू वेडाबाई? म्हणून परत एकदा ओरडला असतासं..
तू रडलीस तर मी कसा जाणार? म्हणून परत एकदा तू माझा असण्याचा, भास तु मला करुन दिला असतासं..
काही क्षण, तुझ्या बरोबर आणखी जगुन घेतले असते..
चालता-बोलता घडलेले सर्व साठवून ठेवले असते..
जगण्यासाठी आणखी एक 'कारण' तरी मिळाले असते..
आयुष्यभर माझ्या ह्रदयात 'आठवण' बनून राहीले असते..
ती खोलून पाहताना, चेहऱ्यावर, अलगद हसु उमटले असते..
तर कधी माझे मन, हुंदके देऊन रडले असते..
.
मी येवढी वेडी नाही रे..
.
तुझे जाणे निश्चित आहे, तेवढे मला कळले होते..
म्हणून तर तुला थांबवण्याचे, साहस सुद्धा मी केले नव्हते..
तुझ्या जाण्याने, मी खचेल, हे सुद्धा ठाऊक होते..
तरी जाण्याची परवानगी तुला, हसत-हसत देत होते..
चेहऱ्यावरती हसू आणुन दुख़ कायमचे लपवले होते..
तुला खुश बघुन, 'मी जगेन', म्हणून मन घट्ट केले होते..
आयुष्यभरासाठी खुश रहा, म्हणून सगळे 'वचन' विसरले होते..

पण, विचारांच्या गुंत्यात आता, मीच पार अडकले होते..
सांगूनही कळणार नाही, येवढे दु:ख झाले होते..
श्वास-धड वेगळे करुन जणू खुंटीवर टांगले होते..

पण खरंच सांगते, त्या क्षणी मीच माझ्याशी हरले होते..
आयुष्य जणू आता, येथेच पूर्णपणे सरले होते..
खरंच, तू थांबायला हवे होते..



- फाल्गुनी

Atul Kaviraje

 Re: खरंच, तु थांबायला हवे होते..(फाल्गुनी धुमाळे)

     फाल्गुनी मॅडम,

     हृदयाच्या व्यथा, दुःखे, हि सर्व ती त्याला सांगू शकत नाही, जेव्हा त्याचे जाणे अटळ असते. कितीही प्रयत्ना - अंती हि तिला ते अशक्य असते. कारण हे विधी-लिखित असते. बऱ्याच प्रयत्नानी तिने आसवांनाही थोपवून धरलंय.

     आता त्याच्यावाचून आपल्याला एकटं जगणं भाग आहे, हे ती ओळखून आहे. तरी पण कुठे तरी एक आशेचा किरण, तिच्या मनामध्ये घर करून आहे. की तो केव्हातरी परतेल. तिच्या जीवनात पुन्हा बहार येईल.

     पण शेवटी नियतीला जे मंजूर तेच होते. खरंच त्याने थांबायला हवं होत. असं तिला आता प्रकर्षाने जाणवत. पण  या गोष्टीला खूप उशीर झाला होता.

     जीवनात नकळत येत कुणीतरी
     आपलसं कधी होतं कळत नाही
     पण ते असणं असतं अल्पावधीच
     दूर जाणंही कधीच उमजत नाही.

-----श्री अतुल एस परब
-----दिनांक-२३.०५.२०२१-रविवार .

Sanjay Makone

मनातील व्यथा कविता रूपाने आपण अतिशय मार्मिक पद्धतीने मांडल्यात
अतिशय सुंदर