एक समज

Started by rudra, March 12, 2020, 02:26:25 PM

Previous topic - Next topic

rudra

मूळात आयुष्य ही एक अशी कॉन्सेप्ट आहे. जी, स्वाभाविकरित्या बदलत असते. आयुष्य हे स्थायीरूप आहे आणि, आयुष्यात घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मानव निर्मित आहेत त्या मिळाल्यामुळे न मिळाल्याने आपल्या जगण्यावर फारसा फरक पडत नाही कारण आयुष्य आणि जगणं यातला आपण फरक समजत नाही. कारण आयुष्याला लिमिटेशन्स आहेत जगण्याला कोणतेही लिमिटेशन्स नाहीत. जगणं हे स्वछंद आणि मनमोकळे पणाने जगायचं असतं आणि, आयुष्य हे त्याच्या परीने पुढे सरकत असतंच तुमच्या जगण्याशी आणि तुमच्या गोष्टींशी त्याचा काहीही संबंध नसतो.आयुष्य ज्या वेगाने जातंय त्याच वेगाने जर तुमचं जगणं असेल तर तुमच्या गोष्टींना अर्थ आहे...