सांगू कशी तुला साजणा

Started by Hanmant Chavan, March 15, 2020, 01:08:47 AM

Previous topic - Next topic

Hanmant Chavan


सांगू कशी तुला साजणा
अधीर मनाच्या वेदना
स्वपनात दरवळते प्रेम भावना
सांगू कशी तुला साजणा

सांजवेळी येता आठवण तुझी
बेभान होते मन स्वप्नांपरी
समजुनी घे प्रितीची भावना
सांगू कशी तुला साजणा

शब्दांच्या कोड्यांमधून निघून 
तुझ्याच स्वप्नांमध्ये रमून जाते
कधी सावरते तर कधी बावरते
मग कासाविस होऊनि मन बोलते
हे प्रेम की यातना
सांगू कशी तुला साजणा
सांगू कशी तुला साजणा

- हनुमंत चव्हाण
   ( कवी, लेखक )