शेवटाची सुरुवात

Started by sachinikam, March 16, 2020, 11:56:48 AM

Previous topic - Next topic

sachinikam

शेवटाची सुरुवात
(कवी: सचिन निकम, मुकुटपीस) (३/२/२०१४)

वाढती लोकसंख्या
धावती जीवनशैली
गलेलठ्ठ महागाई
बेरोजगार तरुणाई
गुदमरणारे प्रदूषण
माणूसकीचे प्रदर्शन
धर्माचा बाजार
भ्रष्टाचाराचा आजार
जंगलांचा ऱ्हास
निसर्गाचा उपहास
ग्लोबल वॉर्मिंग
ओझोन वॉर्निंग
नावाची लोकशाही
कामाची ठोकशाही
दिशाहीन विचार
बंदीस्त आचार
आर्थिक विषमता
निरर्थक समता
पिसाट सांप्रदायिकता
एकतेत विविधता
जीवघेणी स्पर्धा
समतोल अर्धा
अतिरेक संपविण्यासाठी
कात टाकण्यासाठी
शेवटाची झालीय सुरुवात
सामंजस्य राखण्यासाठी.