झिपरी

Started by Dnyaneshwar Musale, March 18, 2020, 11:21:10 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

आज बऱ्याच दिवसांनी तो जरा निवांत बसला होता, नुकतेच पेपर संपले होते, बा ने बैलांच्या वेसनी आखडून जराशी आंग टाकलं होतं, मायेला बा ला चहा द्यायची जरा रोजच्यवाणी नुसतीच घाई झाली होती, तरी आरडा ओरडा करत म्हणत होती,मपला भी लई हात दुखतंया, कंबरची वाट लागलीया, याच लगीन करूया त्या भी नाय करती, पोटा पुरता आता तो भ्या काम करील की एखाद्या पोरीचं भागल की आपल्यामधी अजुन पर यो  म्हतारा कसलं लक्ष घालतय मेलं, काय व्हायचं मेल मपल देवालाच ठाऊक.
        बा चहा न पिता अंग टाकला तसाच खाटव निजला, रोजच्या वाणी बा काय नीट आहे असं दिसतं नव्हतं, काहीतरी बिनसलय हे त म्या उघड्या डोळ्यांनी समजून गेलो होतो, आभाळ भरून आलं अन जरा जरा गळायला लागलं, आखरावरची जनावर बोंबलायला लागली, शेजारची शेवंती नवऱ्याच्या नावाने बोंबा ठोकत होती ढग्याकून पाणी आलाय इरवडाव झाकण घाला, शेवंतीचा नवरा कांनात आधीच कमी त्यात ती बोंबलत होती त्या आवाजाने बाच डोळ उघाडलं,  बान गोणपाटाच घोंगट केलं अन जनावर गोठ्यात बांधली आणि गव्हाणीत डोक्याला हात लावुन तिथंच भीतीला पाठ लावून बसला, रिंकी माझी धाकटी बहीण बा तिला लाडान झिपरी म्हणायचा ,ती बा ला म्हणत होती लई पाऊस फुटलाय, मोक्कार ढग गर्जातय, घराचा आडोशाला बसा की, झिपरिच बा जरा जास्तच ऐकायचा, झिपरिन बा च्या हाताला धरलं आणि घरात न्याल, बा  साठीच्या घरात गेला असला तरी साठीतही अजून आंग धरून व्हता,माय  म्हणायची मपल्या बापाने मपल लवकर लगीन क्याल पर आम्हाला पोरं सहा सात वर्षांनी झाली म्हंजी  म्या धाकटा आणि मग झिपरी,  झिपरी मपल्या पेक्षा चांगलीच हुशार तरी बा ने तिला फकस्त बारावी पोतर शिकावल म्या कसं तरी कालेजला पोहचलो व्हतो, पावसान मघा पासन आता चांगलाच जोर धरला व्हता, बा पुन्हा उठला अनं गोठ्यात जाऊन गव्हाणीत गुरा पुढं बसला.
            खालच्या आळीचा सुका पाटील बाडदाणाचा घोंगटा घेऊन खालच्या आंगाण अंगणाकुन बा क गेला, बा च काहीतरी बिनलस य हे समजलं तरी नक्की काय झालय ह्यो समजत नव्हतं, मागल्या महिन्याला शेजारच्या गावातला पोलीस पाटलाचा पोऱ्या रिंकीला बघून गेलता ह्यो मला माहित व्हतं म्हंजी म्या पण तो पोऱ्या पाहिला व्हता,  रिंकी बा च्या काय पुढं नव्हती, तरी बा ने भी तिला ईचारल व्हतं, लाजत लाजत झिपरी भी हा म्हटली व्हती, म्या त महिनाभरात तिला रडकुंडी आणला व्हत, "लाडाची झिपरी, पण तिच्या नवऱ्याच्या शर्टाला नाय कोपरी", ती ही चिडायची अनं माझं नाव सांगत बा क रडायची, बा बैलांचा चाबूक एका हातान आसडायचा अन मला नुसत्या शिव्या घालायचा, सुका पाटील अन बा याच इशायावर काहीतरी कुजबुजत व्हता, मी जरा भीतीला कान लावूनच व्हतो, सुका पाटील बा ला म्हणत व्हता, कणी बघ पोरगं गुणाच हाय चांगलं शिकेलं हाय काय म्हणत्यात ते लई शिकलेल हाय तव्हा तु काय माग पुढं बघू नको, आता हा म्हणून टाक, मले मगा टेकाड्या बाळू म्हणत व्हता तु नाय म्हणतुया, बा मातर आजून शांतच व्हता तेवढ्यात पाऊस जरा निवाळला, अनं बा सुका पाटलाला म्हणीत व्हता पाटील कणी म्हणताय ते सार मला पटतंय, मागल्या वर्षाला पाऊस नव्हता त पूर वरीस डब्यात गेलंय आधीच माझ्या बोकांडी कर्जाचा बोजा हाय अन त्यात पोराकडली म्हणत्यात हुंडा द्यावा लागील, बा बारीक आवाजातच बोलत व्हता, अरे माझी झिपरी लई गुणाची हाय, जिथल्या घरात जाईल तिथलं घर भरलं, पर यो हुंडा म्या आणायचा कुठुन, ढोरं इकली तरी एवढा पैसा येणार नाय, बघ मपल्यानं हे पेलवत नाय, काय करावं उमजत नाय.सुका पाटील हळूच बोलत व्हता चांगल्या कामाला नाय म्हणायचं नाय अन त्यो तिथनं निघून गेला.
         बा घराच्या मागच्या दारांन मायक गेला अनं मायला सांगत व्हता हुंडा मागत्याय पोराकडली काही समजत नाही एवढा पैसा कुठनं आणायचा, झिपरी मधल्या दाराच्या उंबऱ्यातन ऐकत व्हती, आता तीनही तोंड पाडलं व्हतं, मायन भाकरी करता करता भाकरीचा पुरा कोळसा करून टाकला, कपाळावरच्या कुकाचा घाम खाली व्हगळत व्हता अन माय पदरान पुसत व्हती, पुन्हा बा ला मायेने हळूच सांगल पोरीचं लगीन त करावं लागींल की आता कव्हर ठेवायची तिला अशी, बा न झिपरी क पाहिलं अन तडतडा गोठ्यात निघुन गेला.

क्रमशः