खरंच 'हा' अपराध होता..?

Started by Falguni Dhumale, April 10, 2020, 11:02:27 AM

Previous topic - Next topic

Falguni Dhumale

'शांततेचा त्रास होतो' म्हणणारा, आज 'स्मशान शांतता' घेवून आला होता..
माझे डोळे पुसतांना, स्वत: रडणारा, आज रडण्याला 'नाटकाचं' नाव देत होता..
माझ्या वागण्याने ज्याला 'फरक' पडायचा, आज पाठ फिरवून उभा होता..
स्वप्नांचे घर बांधून, मला एकटीला सोडुन, माझा 'प्राण' घेऊन गेला होता..
माझ्या डोळ्यांनी, बघता त्याला, जणु हंबरडाच फोडला होता..
माझ्याशिवाय कसा जगलासं? हे विचारण्याचा हक्कही आता उरला नव्हता..
तोच आज काय नव्हे ते, बोलण्यासाठी आला होता..
आणि मैत्री/प्रेम, हे सर्व खोटं होतं, हे, आज बोलायला निघाला होता..

रुसलेल्या ओठांनी, सारखे-सारखे विचारत होता..
येवढी कशी भुलून गेलीस गं?, साधा प्रेम आणि मैत्रीतील, तुला फरक सुद्धा कळला नव्हता..?
तुझ्याशिवाय मला सुद्धा तेवढाच त्रास झाला होता..
हे बोलुन अचानकच, बोलता-बोलता थांबला होता..
का? तो फक्त हेच, बोलायला इथवर आला होता..?

मी अपराधी नजरांनी, उभे राहून, पुढ्यात श्वास टाकला होता..
वाटत होते, ओरडून विचारावे, का खोटे नाटकं करतोसं? का तु ही माझ्यावर जीव टाकला नव्हतासं?
का त्रास होतोय तुला? तु तर माझ्याशिवाय खूश असायला हवा होतासं..
रोजची कटकट् न ऐकता, तु मनसोक्त जगु शकणार होता..

पण, दुर राहूनही विसरला नाहीस ना..? म्हणजे परकं तर, तुही समजत नव्हता..
तुला काय वाटले? दुर जाण्याने, तु हे सर्व कोडे, सोडवू शकणार होतासं?
असा का वागलासं? खरंच हे विचारण्याचा बेत होता..
पण,
बोलण्याने सर्व अस्थाव्यस्त होईल, म्हणून स्वत:चाच गळा घोटला होता..
हुंदके येवू नयेत म्हणून, श्वास पण रोखून धरला होता..
काहीच न बोलता, त्या रस्त्याला मी, कायमचा पूर्णविराम दिला होता..
मला माझी चूक कळायला, खरंच? येवढा वेळ लागला होता..?
न कळता, खरंच मी, येवढा मोठा गुन्हा केला होता..?
जो आज आमच्या, आड येवून, तुटण्याचे कारण बनला होता..

'परत भेटणार नाही' म्हणतांना, तो जराही अडखळला नव्हता..
खरंच तो 'हा' आहे? ज्याला मी माझे समजण्याचा 'अपराध' केला होता..



- फाल्गुनी

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

खरंच जबरदस्त आहे कविता आवडली


Viresh kasture

 डोळ्यात पाणी आणले ह्या कवितेने खूप छान आहे आवडली कविता

Falguni Dhumale