कोरोना व्हायरस

Started by Somnath talekar, April 13, 2020, 10:37:00 AM

Previous topic - Next topic

Somnath talekar

कारण लॉकडाऊन चे दिवस
सर्वांसाठी सारखे नसतात


आज दिवसेंदिवस कोरोनाचं
संकट वाढतच चाललंय
लॉकडाऊन मुळे गरिबांच्या मात्र
तोंडचं पाणीच पळालंय
कधी संपेल हे सगळं असंख्य प्रश्न
हातावर पोट असणाऱ्यांना भेडसावतात
कारण लॉकडाऊन चे दिवस
सर्वांसाठी सारखे नसतात

कित्तेक जण घरी का होईना
पण सुट्टी एन्जॉय करतात
आपलं घरदार सोडुन पोलीस, डॉक्टर
आपलं कर्तव्य बजावताना दिसतात
आपल्यावरूनच विचार करावा की
त्यांनाही कुटुंब असतात
कारण लॉकडाऊन चे दिवस
सर्वांसाठी सारखे नसतात

आज आपल्याला घरी राहून
कडधान्य,भाजीपाला भेटतोय
कारण शेतकरी शेतामध्ये
दिवस-रात्र कष्ट करतोय
आज शेतकरी माल विकेल का?
अन् जर विकलाच तर योग्य भाव मिळेल का?
ह्याच विचारात असतात
कारण लॉकडाऊन चे दिवस
सर्वांसाठी सारखे नसतात

संकटात कित्येकांनी माणसातला
माणूस ओळखून माणुसकी दाखवली
कुणी अन्नधान्याची तर कुणी पैश्याच्या स्वरूपाने मदत केली
आता फक्त दिलेल्या  नियमांचे पालन करा
कारण सगळ्यांचीच बँक मध्ये खाते नसतात
अन् लॉकडाऊन चे दिवस
सर्वांसाठी सारखे नसतात

शब्दांचा जादूगर:-सोमनाथ तळेकर
मो.नं 8108885930