फक्त तुझ्यासुखासाठी

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 29, 2020, 07:59:55 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.फक्त तुझ्या सुखासाठी*

ती इतक्यातच कुठून तरी आली होती
मी मात्र तसाच उभा होतो
आठवणीने ओला चिंब भिजलेला
तिला विचारावं म्हणलं जरा
रांगड्या भाषेत पण हिंमत झाली नाही
कारण तिच्यावर आता हक्क राहिला नव्हता
चाळीतल्या सर्वांची कान टवकारले
मी काही बोलेल म्हणून पण
आता सर्वस्व गमावलं होतं
माझं होत नव्हतं ते तिला बहाल केलं होतं
माझं अस्तित्व माझं घरपण
आणि उरलं सुरलं सुख पण

हे ही फक्त आणि फक्त तुझ्या सुखासाठी....

आता कुठे तरी समाजाच्या
नजरेत चांगला झालो
गावच्या चावडीवर बसून
सुखी जीवनाचे धडे गिरवू लागलो
माझ्या अस्तित्वाला काडी लावून
तिनं पाहिलेलं सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी
मी माझा... माझा न राहिलो
विसरून गेलो देहभान सारे
दुःखाचे भिर भिर नारे वारे
लाथाळून अंतकरणातून रडणार मी
अश्रू सुखाचे वाहू लागलो

हे ही फक्त आणि फक्त तुझ्या सुखासाठी....

चांगलंच झालं म्हणायचं
गावात रोज चर्चा व्हायची
तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट
समद्या गावात वेगवेगळ्या रंगात सजायची
तू गेलीस गं हाताला रंग लावून
हळदीचा मी मात्र तसाच राहिलो
शेवटी श्वास अडकले होते गं देहात माझ्या
मेलो नाही तोच गावात चर्चा झाली
हा खैस होईल म्हणून
आता तरी ये ना गं वाट पाहतोय
खैस म्हणून मरायचं नाही गं
फक्त आणि फक्त एकदा हो म्हणून जा
उरलं सुरलेलं माझं आयुष्य घेऊन जा
फुलांची माळ आणू नकोस
दोन फुल जरी वाहिलीस
प्रेमाने देह शांत होईल
आत्मा अनंतात विलीन होईल

हे ही फक्त आणि फक्त तुझ्या सुखासाठी..

✍🏻(कविराज.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर