शाक्यमुनी तथागत

Started by Rushi.VilasRao, May 07, 2020, 12:10:00 AM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

आज ७ मे २०२०.. आज बुद्ध पौर्णिमा म्हणजेच वैशाखी पौर्णिमा...
हजारो वर्षांपूर्वी समस्त जगाला शांतीचा प्रेमाचा भुतदयेचा करुणेचा संदेश देणाऱ्या शक्यामुनी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जन्म दिवस... आज ७ मे ला वैशाखी पौर्णिमेलाच या मंगल दिनी सिद्धार्थ यांचा जन्म झाला आणि एवढंच नाही तर जगाला शांतीचा प्रेमाचा करुणेचा संदेश देणाऱ्या या महाणातम्याचा जन्म, माहा ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण वैशाखी पौर्णिमेलाच झाले आणि म्हणूनच या मंगल  दिनी अत्यंत महत्त्व आहे....
पण भारतात बुद्ध पौर्णिमा/ बुद्ध जयंती कधी पासून , कशी, साजरी होवू लागली या मागील छोट्याश्या शब्दात मांडलेला हा इतिहास...(विकिपीडिया व बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या सहाय्या च्या मदतीने घेतलेले संदर्भावर आधारित)...
बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे वडिल आणि त्यांचे मित्र यांची एकदा भेट झाली आणि त्याच दिवशी साहेब शाळेतील परीक्षेत पास झाले होते सर्वांनी त्यांच खूप कौतुक केलं... त्यांना वाचनाची नितांत आवड होती हे त्यांना म्हणजेच त्यांच्या वडिलांच्या मित्रांना माहीत होत म्हणून त्यांनी साहेबां साठी बुद्ध यांच्या जीवनावर आधारित एक पुस्तकं आणलेलं होत... ते बाबासाहेब वाचत व अगदी लहान वयापासूनच त्यांच्या वर बुद्धांच्या धम्माचा तत्वज्ञानाचा प्रभाव पडला... बरीच वर्ष अशी निघून गेली....
आणि तो दिवस उजाडला..
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर विचार मांडले व जमलेल्या जनतेला त्या बद्दल मार्गदर्शन केले.....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)...

१९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. १९५६ ला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. दिल्लीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस १९५३ पासून सुरुवात केली. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरूवात बाबासाहेब आंबेडकर यांनीच केली.

इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या.' अशी आग्रही मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख बाबासाहेबांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे...

आज हजारो वर्षां नंतर सुद्धा भगवान बुद्ध आणि त्यांनी दाखवलेले मार्ग समस्त जगाला अगणित मोलाचे मार्गदर्शन करत आलेले आहे व करत राहणार आहे....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)...
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan
*या मंगल दिनी आपल्याला व आपल्या परिवारास बुद्ध पौर्णिमा च्या मंगलमय शुभेच्छा....* 🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️💐💐💐
_तुमचाच *"K'rushi"*_ ☺️