चिऊकाऊची गट्टी

Started by Shilpa Mohite, May 10, 2020, 07:46:49 PM

Previous topic - Next topic

Shilpa Mohite

पुष्प ५ वे
          चिऊकाऊची गट्टी

कावळा म्हणतो चिमणीला
मी आहे काऊ, तू आहेस चिऊ
आपण दोघे बहीण भाऊ
संगत सोबत खेळायला जाऊ

चिमणी म्हणते कावळ्याला
रंग तुझा काळा, तुला एकच डोळा
तू नाहीस माझा भाऊ
नको मला लाडीगोडी लाऊ

कावळ्याचे घर शेणाचे
चिमणीचे घर मेणाचे
पाऊस आला धावून
कावळ्याचे घर गेले वाहून
उन्हाने एकदा केला कहर
वितळून गेले चिमणीचे घर

दोघे झाले निराधार
घेतला एकमेकांचा आधार
सुटली त्यांची कट्टी
दोघांची झाली एकदम गट्टी
       
               -शिल्पा मोहिते