तुझ्याच सवे

Started by Shubhangi Gaikwad, May 15, 2020, 10:25:31 AM

Previous topic - Next topic

Shubhangi Gaikwad

आठव, घेताना सात फेरे वचन दिले तू मला अन् तुला मी
राहीन मी तुझा अन् तू माझी, सात जन्मी नव्हे जन्मोजन्मी
नको कंठ दाटू, नको अश्रू ढाळू,नको त्रस्त करू जीवा
येईन मी  परतूनी, वाट पाहीन तुझी, घेऊनी जन्म नवा

भरभरूनी घेतला सुगंध फुलवूनी बाग स्वप्नातील
चांदण्यात न्हाऊन मोजले असंख्य तारे आकाशातील
सूरात सूर मिसळूनी निर्मिला जीवन संगीतात गोडवा
नको कंठ दाटू,नको अश्रू ढाळू, नको त्रस्त करू जीवा
येईन मी परतूनी, वाट पाहीन तुझी, घेऊनी जन्म नवा

न पटले तुला कधी रुसूनी जाऊन धरीशी अबोला
न पटले मला कधी रागावूनी न राही भान संतापाला
सारे क्षणीक, संसारपटावर अवतरला नाही कधी दूरावा
नको कंठ दाटू,नको अश्रू ढाळू, नको त्रस्त करू जीवा
येईन मी  परतूनी, वाट पाहीन तुझी, घेऊनी जन्म नवा

दोन आत्म्यांनी मिळून रेखाटलेले  सुंदर चित्र संसाराचे
रंगविले चित्र देखणे भरूनी रंग प्रेम आदर अन् विश्वासाचे
राहीलो दक्ष, ठेवण्या एकरूपतेचा रंग सतेज हिरवा
नको कंठ दाटू,नको अश्रू ढाळू, नको त्रस्त करू जीवा
येईन मी  परतूनी, वाट पाहीन तुझी, घेऊनी जन्म नवा

सामावलीस जिवनात माझ्या जशी विलीन नदी सागरात
जेथे ज्योत तेथे  प्रकाशा तसेच झालो समरस एकमेकात
अर्धांगी तू माझी असेन तुझ्याच सवे जरी येई ईश्वरी सांगावा
नको कंठ दाटू,नको अश्रू ढाळू, नको त्रस्त करू जीवा
येईनी मी परतूनी, वाट पाहीन तुझी, घेऊनी जन्म नवा

नको शोक करू ह्या जीर्ण वस्त्राचा जाण अमरत्व आत्म्याचे
नसण्यात सापडेल माझे असणे, उघडताच दार आठवणींचे
हो शांत ,नव्यानं जन्म घेण्या आधी, क्षणभर घेऊ दे विसावा
नको कंठ दाटू,नको अश्रू ढाळू, नको त्रस्त करू जीवा
येईनी मी परतूनी, वाट पाहीन तुझी, घेऊनी जन्म नवा

शुभांगी सुभाष
shubhgaik@gmail.com

Rohan Rajendra Bhosale

कविता खुप छान आहे. नमस्कार मी, रोहन भोसले.
मराठी चित्रपट सृष्टी मधे काम करतो. कवी, गीतकार, अभिनेता म्हणून. आणि माझं "प्रेम काव्य" नावाने युट्यूब चॅनेल आहे. त्यांवर मी माझे कविता आणि इतर कवी, कवयित्री चे कविता अपलोड करतो. त्याच्या सहमतीनेच. तुमची कविता द्याल का? माझा नंबर - ८१०८९१९२३४
चॅनेल लिंक 
https://www.youtube.com/channel/UCLZ1vUbt0U_2KvFj2jcPYyg

Shubhangi Gaikwad

तुम्हाला कविता आवडली त्या बद्दल धन्यवाद. हो , तुमच्या youtube channel
वर माझी ही कविता सादर करू शकता.

Rohan Rajendra Bhosale

हो मॅडम. तुम्हाला लिंक कोठे शेअर करू?