तू लेखणी माझी

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, May 15, 2020, 01:18:06 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तू लेखणी माझी*

तू लेखणी माझी
मी तुझा कोरा कागद
नेहमी तुझ्या स्वप्नांची
माझ्या कवितेला साद

अशीच रहा तू सखे
काळजाची होऊन
तुला आठवत राहील
तुझ्या काळजात राहून

विखुरला जातो मी
तुझ्या मिठीत येतांना
प्रेमाच्या गोष्टी सखे
तुझ्याशी बोलतांना

तू असावीस जवळ
स्वप्नात नवे रंग भरतांना
कासावीस होतो मी
ती सांज जवळ येतांना

तू जवळ असलीस की
शब्दांची शाळा भरते
तू समोर आहेस समजून
नव्या कवितेची मांडणी होते

वाऱ्याची झुळूक होऊन
किती तरसावणार आहे
आता आसवे होऊन तू
असं किती बरसणार आहे

✍🏻(कविराज.अमोल मीरा दशरथ शिंदे)
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Naresh Kailas Wankhade

    "अशी ती"
"अशीच रोज ती मला
लपुन मारते
पहावया नको कुणी
जपुन मारते.
      कशाला ओढलास,
      म्हणे पदर तु गडे
      केंव्हाही मज 
      ती झोकुन मारते.
नजरेत माझ्या मी,
जरी पडलो असेल आज
प्रितीचा गंधही तिचा
मज जळुन मारते.
       वाटेतला अंधार,
       सांगुन गेला सारेच मजला
       उजेडाची आर्त ही मज आता
       जाळुन मारते.
डोळ्यात तिच्या जरी,
पाहतो मी दुनिया रोज
उगवती पहाट मज
तिच्याच भितीने मारते.
       सुर्याने ना रात्र पाहीली,
       ना चंद्राने हा प्रकाश
       हद्याची धडधड आता
       मज जिवेच मारते.
धाकात जगतो आहे माझाच मी,
रोज आता
साधा डोळाही मज ती
तपुन मारते.
       अशीच रोज ती मला
       लपुन मारते
       पहावया नको कुणी
       जपुन मारते".     
    *--------*---------*--------*---------*   
       श्री.नरेश कैलासराव वानखडे.

Naresh Kailas Wankhade