🏡वृध्दाश्रम 🏡

Started by Sameer95, May 17, 2020, 10:56:14 PM

Previous topic - Next topic

Sameer95

🏡वृध्दाश्रम 🏡
✍🏻 लेखक - समीर दिलीप भोजने.
📲  ८९७५६७२९३३
🅱 - sambhojane1.blogspot.com

          असाच एकदा फिरता फिरता वृध्दाश्रमाकडे पाय वळले. वृध्दाश्रम म्हणजे अनाथ आई-बाबांसाठी असलेले आश्रम. इथे अनाथ शब्द मुद्दाम वापरला आहे. आई-बापाला वार्यावार सोडुन दिलेल असतं म्हणजेच घरातुन बाहेर काढलेले असे अनाथ आई-वडील. ते मुळात अनाथ नसतात पण तुमच्या आमच्या सारखे त्यांना अनाथ करतात.
           नऊ महिने पोटात वाढवुन आपल्या मुलाला जन्म देतात. हव्या तशा सोयीसुविधा पुरवतात. पण तीचं मुलं मोठी झाल्यावर सगळं विसरुन जातात. स्वतःच्या जीवाचा विचार न करता आपल्याला सांभाळते. ती आई आणि स्वतःची दुःख लपवुन काबाडकष्ट करतो तो बाप. यांचा जरा सुध्दा विचार तेव्हा केला जात नाही.
           परवाच कानावर आलं की एका विवाहीत मुलाने आपल्या आई-वडीलांना वृध्दाश्रमात नेऊन ठेवले. बिचारे आई-वडील रडत बसले होते. त्या मुलाला जाब विचारला असता त्याने सांगितले, माझ्या बायकोला वेगळं रहायचयं. तिला त्यांचा त्रास होतो. पटत नाही त्यांच्याशी. हे सगळं ऐकुन धक्का बसला होता. त्यावेळी त्याचे आई-वडील त्याच्याजवळ दयेची भीक मागत होते पण त्याला ती भीक दिसत नव्हती. मी तर म्हणतो, भीक मागायची वेळ आलीच कशी? अरे ज्या आई-वडीलांनी मागचा पुढचा विचार न करता तुला ईथपर्यंत वाढवलं त्याची जरा तरी लाज बाळगायला पाहीजे होती आणि बायकोचा ऐकणारा हा कोण? ती आज आलेय पण हे आई-वडील तुझ्या जन्मापासुन तुझ्या सोबत आहेत.
           हे सगळं बघुन चेहरा रडवेनासा झाला होता. आपली ही अवस्था होऊ शकते तर त्यांची काय अवस्था झाली असेल.त्या आई-वडीलांच्या समोर बसलो होतो. पण धीर देण्याशिवाय दुसरं काही करु शकत नव्हतो. नुकतचं त्या बापाने माझ्याजवळ मोबाईल आहे का विचारलं. फोन लावायचा होता त्यांना आपल्या मुलाला. मी आश्चर्यचकीत झालो कारण मोबाईल त्यांच्याजवळ सुध्दा होता. मी त्यांना मोबाईल तुमच्याजवळ सुध्दा असुन का मागितला असे विचारले. पण यावर त्यांचे उत्तर ऐकुन धक्काच बसला होता. " बाळा, मोबाईल आहे पण का कुणास ठाऊक मुलाचा फोन येत नाही. बहुतेक मोबाईल बिघडला असेल आमचा." पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोबाईल व्यवस्थित होता पण बिघडला होता त्यांचा मुलगा. थोडक्यात काय तर मुलगा त्यांना अजिबात फोन करत नव्हता. पण ते आई-वडील स्वतःच्या मनाची समजुत काढुन जीवन जगत होते.
           आज अशी वेळ का त्यांच्यावर आली? थोडा विचार करण्यासारखा आहे. ह्यात चुक कोणाची होती? स्वतःच विचार न करता तो त्यांच्यासाठी झटला तो बाप ही चुक होती की हाताच्या फोडाप्रमाणे जपलं ती आई ही चुक होती? तसं म्हणायला गेलं तर कित्येक आई-वडील वृध्दाश्रमात वाट बघत आहेत. पण त्यांच्या मुलांना भेटायला वेळ नसतो. आज ना उदया ही वेळ आपल्यावर सुध्दा येणार आहे हे क्षणार्धात आपण विसरुन जातो. बायकोचं ऐकुन घराबाहेर काढत असालं तर तुमच्यासारखा मुर्ख कोणी नाही.
          वृध्दाश्रमामध्ये एक पाटी वाचली होती, " सुकलेल्या पानांवरुन हळु चाला कारण एके काळी हीच पाने आपल्याला सावली देत होते " खुप मोठा अर्थ होता त्या वाक्यांमध्ये. ह्या सगळ्यांचा विचार करता करता कधी वृध्दाश्रमातुन बाहेर पडलो कळलचं नाही. पण अनुभव थोडा वेगळा होता.

---------------- समाप्त -----------------

श्रद्धा वऱ्हाडे

धन्यवाद सर खूप सुंदर लिखाण आहे तुमचं. खूप सुंदर आणि भावपूर्ण असा हा लेख आहे. हा लेख आम्हा सर्व तरुण पिढीला खूप काही सांगून जातो आणि यामधून नक्कीच बोध घेऊन कुणावरच अशी वेळ येणार नाही आणि येऊ देणारही नाही अशी मी एक मुलगी म्हणून या ठिकाणी ग्वाही देते.धन्यवाद🙏🙏