मी त्या बेवड्या सारखा आहे

Started by Akkison3, May 18, 2020, 07:10:28 AM

Previous topic - Next topic

Akkison3

मी त्या बेवड्या सारखा आहे
जसा तो त्या दारुच्या बोटल वर प्रेम करतो
तसं मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो


मी त्या बेवड्या सारखा आहे
त्याला माहीती आहे की दारू पिल्याणे त्याचं लिवर कमजोर होईल
तरीही तो  ती बोटल ह्रदयाला लावुन बसतो
तसं मला माहिती आहे तूला आठवल्या नंतर खूप त्रास होतो
तरीही मी सारखं सारखं तुझ्या आठवणीत बसतो


मी त्या बेवड्या सारखा आहे
त्या दारूच्या बोटल वर लिहिले असतं (दारू स्वस्थासाठी हानिकारक आहे)
तरीही तो त्यातले दोन थेंब हि न सोडता पुर्ण बोटल प्रेमाने पिउन टाकतो
तसं मला माहिती आहे तु मला आपलं कधी नाही समजणार
तरीही मी घरच्यां पेक्षा जास्त तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो


मी त्या बेवड्या सारखा आहे
शेवटी मरताना ही तो दारू चांगली होती
साला लिवर कमजोर निघालं असं बोलत बसतो
तसं मला माहिती आहे मी कुठे तरी तुझ्या नजरेत कमी आहे
तरीही मी नशीबाला दोष देत बसतो